आषाढी सोहळ्यात ज्ञानदादा कडून बहीण मुक्ताईस साडीचोळी अर्पण…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पंढरपूर : बहीण मुक्ताबाईस बंधू ज्ञानदादा कडून साडी चोळी आषाढी पालखी पर्वावर अभिषेक पुजनाने संत मुक्ताई यांना मोठ्या भक्तिभावाने अर्पण करण्यात आली. संत परंपरेत बहीण भावाचे नाते जपणारा सह्रदय सोहळा पंढरपूर येथे मुक्ताबाई मठात संपन्न झाला.

      आषाढी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे विविध संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होत असतात यामध्ये संत परंपरेतील असणारे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, आणि संत मुक्ताबाई हे संतबंधू बहीण सुध्दा दाखल होत असतात. आषाढ शुद्ध त्रयोदशी या शुभ दिनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी संत मुक्ताबाईंच्या पादुकांची विधीवत पूजा करून साडीचोळी अर्पण केली.

       यावेळी संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, विश्वस्त रवींद्र महाराज हरणे, उध्दव महाराज जुनारे, वेद मुर्ती यज्ञेश जोशी, उमेश महाराज बागडे, मनोहर अवचट, ज्ञानेश्वर पोंदे तसेच वारकरी भक्तजन मोठ्या भक्तिभावाने उपस्थित होते.

        दरवर्षी आषाढी सोहळ्यात भाऊराया ज्ञानदादा कडून दिला जाणारा या साडी चोळी भेटीचा अमुल्य ठेवा मोठ्या सन्मानाने जपून ठेवला जात येणाऱ्या भाऊबीज सणाला संत मुक्ताबाई यांना मोठ्या भक्तिभावाने केला जातो असे संत मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्त रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले.