४० वर्षाची अविरत सेवेनंतर अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त…

उमेश कांबळे ता प्र भद्रावती – 

      भद्रावती तालुक्यातील चपराळा अतिदुर्गम भागात ४० वर्ष अंगणवाडी सेविका या पदावर कार्य केल्यानंतर नुकताच शकुंतला रामदासजी मत्ते या वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्या त्यामुळे चपराळा गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार समारंभचा कार्यक्रम घेतला.

     तालुक्यातील चपराळा गावात शकुंतला मते या एकमेव महिला दहावी उत्तीर्ण असल्याने त्यांना अंगणवाडी सेविका या पदावर १९८३ मध्ये समाविष्ट करण्यात आले. गावातील अशिक्षित पणा तसेच अंधश्रद्धा यावर त्यांनी गावात अनेक कार्य केले. बालसंगोपन यावर विशेष भर दिला. त्यांच्या या कार्यकीर्दिला शासनाने अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. त्यांचा नुकताच सेवानिवृत्ती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी तालुक्यातील अंगणवाडी सेविका तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.