वादाच्या भोवऱ्यात जीवनाशी मारन्याचा प्रत्यन.. — नात्याला काय म्हणावे?

 

उमेश कांबळे 

ता प्र भद्रावती- 

        शहरतील अहिल्या देवी नगर येथे दी 1 जुलैला सकाळ च्या सुमारास झोपेत असलेल्या गुलाब लक्ष्मण दाते वय ७२ वर्ष याला दगड़ाने मारुन जीवनाशी ठार मारन्याची थरारक घटना घडली आहे.

        प्राप्त माहिती नुसार गुलाब लक्ष्मण दाते वडिल व सूरज गुलाब दाते मुलगा यांच्यात पैशाच्या कारणावरुन नेहमी वाद विवाद होत होता.

       मात्र आज सकाळच्या सुमारस पेंशनचे पैसे देत नसल्याच्या कारणावरुन वादविवाद होऊन गुलाब लक्ष्मण दाते याना जीवेनिशी ठार मारन्याचा प्रत्यन जन्मदात्या मुलाने केला आहे.त्यांना उपचारकारिता ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे भर्ती केले आहे व उपचार सुरू आहेत. 

        आरोपी सूरज गुलाब दाते याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे,पुढील तपास थानेदार बिपिन इंगळे करीत आहे.