३३/११ के. वी. विद्यूत ट्रान्सफॉर्मर अहेरीला केंव्हा मिळणार? — तालुका कांग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार अहेरी यांना निवेदन सादर..

 

   रमेश बामनकर

तालुका प्रतिनिधी अहेरी

                           अहेरी – अहेरी गडचिरोली जिल्ह्यातील तीन विभागा पैकी अहेरी हे विभाग पाच तालूक्याचे मध्यभाग विविध शासकीय कार्यालय , पोलीस उप मूख्यालय ग्रामीण उप जिल्हा रूग्णालय अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय , उपविभागीय कार्यालय , असलेले ठिकाण व जवळपास ३०००० हजार लोकसंख्या असलेले ही वस्ती , जिल्ह्याच्या उंबरठ्यावर अहेरी शहरांचे संभाव्य नाव आहे . इथे दररोज लोकांची वर्दळ असते .इतके असून सूद्धा अहेरी राजें ची वस्ती आहे . परंतू विद्यूत ३३/११ के. वी चे ट्रान्स्फर अजून पर्यंत लागले नाही. शेवटी अहेरी ला आल्लापल्ली वर अवलंबून राहावी लागते आहे . १९७२ पासून म्हणजे जवळपास ५३ वर्ष पूर्ण झालेत परंतू कोणाला देणे घेणे नाही . कारण विद्यूत नसले तर बरेच काम होत नाही . जनतेला शासकीय कामे करताना खूपच त्रास होते. जवळ पास क्षेत्रपळानूसार लांब पल्ल्याचे प्रवास करून जर कामे होत नसेल तर मूक्काम करावे लागते . त्याला कारण म्हणजे विज दररोज जाणे – येणे,कमी वीज दाब हे प्रमूख कारण वीजवितरण अधिकारी सूद्धा प्रयत्न करतात परंतू टेक्निकल अडचण असल्यामुळे ते सूद्धा हतबल झाले आहे. हे प्रमूख मागणी घेवून तालूका कांग्रेस कमेटी अहेरी तर्फे समस्याचे लवकरात लवकर निराकारण करून अहेरी करांची मूळची समस्या सोडवावी. निवेदन मा.तहसिलदार अहेरी मार्फेत मा. उपमुख्यमंत्री म.रा. व पालक मंत्री गडचिरोली यांना निदर्शनास आणण्यात येत आहे . डॉ. पप्पू निसार ता. अध्यक्ष अहेरी मधूकर सडमेक अनू. सेल हनीफभाई शेख अल्पसंख्याक आघाडी ,अशोक आईंचवार , ग्राहक संरक्षण सेल नामदेव आत्राम किसान सेल, रागोबा गौरकार , संतोष समूद्रालवार , गणेश उपलपवार इतर पदाधिकारी उपस्थित होते.