अहेरी तालुका काँग्रेस कमिटीच्या रस्त्यासंबंधी पाठपुराव्याला यश..

 

     रमेश बामनकर

तालुका प्रतिनिधी अहेरी

अहेरी मागील अनेक दिवसापासून अहेरी – आलापल्ली रस्त्याची दुरावस्था झालेली होती, दरवर्षी डागडुगी केल्या जात होती परंतु पक्का रस्ता बनत नव्हता त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, कित्येक अपघात सुद्धा, या रस्त्यावर झालेले आहेत, जीव धोक्यात टाकून नागरिकांना प्रवास करावा लागत होता, दुचाकी व चार चाकी वाहनांना फार मोठा अडचणींना समोर जावे लागले या रस्त्याचे नूतनी करण होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा निवेदने दिलेली होती, व त्याचप्रमाणे अहेरी तालुका काँग्रेस कमिटीने तीन ते चारदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सी संपर्क साधून पक्के रस्त्याची मागणी केलेली होती, या क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले अखेर निधी प्राप्त होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे नुकतीच आठ दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बलवंत रामटेके साहेब यांची अहेरी तालुका काँग्रेस कमिटीच्या शी स्टमंडळाने भेट घेऊन रस्त्याचे काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता काँग्रेसच्या या पाठपुराव्याला यश आले असून कामाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे या मार्गावरून चालणाऱ्या नागरिकांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे,, या विभागात कोणत्याही अडचणी असल्यास तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांशी, संपर्क साधावा, जेणेकरून आपल्या मागण्या शासनापर्यंत पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशी माहिती अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर निसार हकीम यांनी दिलेली आहे..