माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा तालुक्यातील गर्कपेठा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा बांधकामासाठी केली पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत..!!

 

    रमेश बामनकर

तालुका प्रतिनिधी अहेरी 

       सिरोंचा तालुक्यातील गर्कपेठा येथे भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा बांधकाम करण्यासाठी तेथील गावकऱ्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती,ही बाब अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कानी पडताच त्यांनी गर्कपेठा येथील गावकऱ्यांना बोलावून केली 50000/-(पन्नास हजार) रुपयाची आर्थिक मदत केली.

         आज लोकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा एक केंद्र बिंदू बनेल,

      आपल्या देशाचे संविधान रचयिते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्या अंगात एक सकारात्मक ऊर्जा संचारते आणि आजच्या युवा पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्यात रुजवावे आणि आपली प्रगती करावी आपलं आणि आपल्या देशात, आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक करावे असे मत यावेळी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी गर्कपेठा येथील गावकऱ्यांना बोलून दाखवले.

       यावेळी माजी सरपंच सोमय्या दुर्गम, रवि दुर्गम, राजकुमार जाडी, सुधाकर कुम्मारी ,कोला वेलादी ,रजशेकर दुर्गम, तिरूपती,किरण दुर्गम, श्रावण दुर्गम आणि गर्कपेठा येथील गावकरी व युवा वर्ग उपस्थित होते..!!