Home देशविदेश क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एक महान तत्वज्ञानी…

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एक महान तत्वज्ञानी…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

     महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे जनक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त (११ एप्रिल),”दखल न्यूज भारत परिवार त्यांना,”विनम्र अभिवादन!,करतो आहे.

       बहुजनांच्या उद्धारासाठी आणि समतेसाठी महात्मा जोतिबा फुले यांनी देह झिजविला.

     “विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली,नीतीविना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्ताविना शूद्र खचले,इतके अनर्थ एका अविद्येने केले!” –

     असे सांगणारे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले महान तत्वज्ञानी होते.तद्वतच ते स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते!,याचबरोबर सामाजिक समता आणि शिक्षणाची मशाल त्यांनी पेटवली.

          सत्यशोधक समाजाचे संस्थापक असलेले महात्मा जोतिबा फुले हे शेतकऱ्यांचे कैवारी होते.त्यांनी महिला व बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे उघडली.ते दुरदृष्टीचे थोर समाजसुधारक होते.

        शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे,हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारत देशातील महिला/पुरुषांना सांगितले.