” Dr. Ambedkar, on the occasion of his Golden Jubilee had said : ” You have been celebrating my birthday from fifteen years. I have never attended them. I have always been opposed to them. You have celebrated my Golden Jubilee now , let that be enough. Let there be no more celebrations. “
वरील बाबासाहेबांचा आदेश आम्हाला काय सांगून जातो?
14 एप्रिल 1941 रोजी मुंबईतील आपला समाज त्यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करत होता.गेल्या पंधरा वर्षापासून ते साजरा करत असत आणि दरवर्षी ते त्या वाढदिवसाला बाबासाहेबांना आमंत्रित करत असत.पण बाबासाहेब नेहमी टाळत असत. परंतू पन्नासाव्या वाढदिवसाला ते मुद्दाम उपस्थित होते.ते केवळ एक संदेश देण्यासाठीच.
कारण त्यांना वाढदिवस साजरा करणे म्हणजे आपण मृत्यूच्या जवळ किती आलोय याची आठवण करून देणारा दिवस आहे.असे ते मानत असत.त्याचप्रमाणे एखाद्या महापुरुष किंवा तत्ववेत्त्याचा वाढदिवस,जन्मदिवस किंवा जयंती साजरे करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या वैचारिक क्रांतीला न स्वीकारता,केवळ प्रतिमा स्वीकारून,स्वतः आचरणातून सिद्ध न करण्याचा बहाणा म्हणजे तो दिवस साजरा करणे,असे ते मानत!…
ही कुसंस्कृतीक परंपरा मनुवादी व्यवस्थेची देण असून आपल्याला यातून बाहेर पडलेच पाहिजे.असे ते मानत असत.
म्हणूनच त्यांनी त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानंतर यापुढे माझे वाढदिवस साजरे होणार नाहीत.याची दक्षता घ्या.हा जणू आदेशच आपल्याला त्यांनी 14 एप्रिल 1941 रोजी दिला होता.
परंतू,बाबासाहेब एकीकडे तुम्हीच म्हणता की 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करा.
मग हे कसं काय?….
बाबासाहेब आम्ही फारच बेरकी,पाहिजे तिथे तुमच्या विचाराचा वापर करून स्वार्थ साधणारे आम्ही बुद्धीजीवी.
कारण तुम्ही सांगताय की महापुरुष म्हणून शाहू राजांची जयंती साजरी करा…….
तर मग आमच्यासाठी महापुरुष तुम्हीच.म्हणून तुमची जयंती आम्ही साजरी करतो ती सुद्धा तुमच्या सम्यक आदेशाशिवाय आणि त्याच्या अंमलबजावणीशिवाय ती केवळ स्वतःशिवाय इतरांना सांगण्यासाठीच……
बाबा,जर आपल्याला 1945 लाच महापरीनिर्वाण आले असते तर आमच्या घरातल्या भिंतीवर तुमचा फोटो लागला असता का?
1945 पर्यंत तर तुमचा सामाजिक लोकशाहीचा संघर्ष शिगेला पोहोचला होता!..
1945 नंतरच तर संविधानक्रांती आणि धम्मक्रांती आमच्या पदरात पडली ना?,”मग तुझा अनुयायी याचे विश्लेषण आता कसा करू शकेल?,”याचे उत्तर काय देऊ शकेल?
बाबा,हे परीक्षण करण्यासाठी,स्वतःला हा प्रश्न पडण्यासाठी,त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्याच्यापर्यंत विवेकशक्ती प्रगल्भ करण्यासाठी पोहचवण्याचे काम तुम्ही ज्या बुद्धीजीवी वर्गाकडे जबाबदारी सोपवली होती.तो बुद्धीजीवी वर्गच मनुवाद्यांचा गुलाम होऊन साडी,माडी, गाडीमध्ये रममाण झाला.
संविधानिक आरक्षणाचा लाभ घेऊन तुम्हाला बेईमान झाला,म्हणून बाबा तुमच्या खऱ्या अनुयायाला तुमच्या वैचारिक क्रांतीची ( संविधानक्रांती आणि धम्मक्रांती ) ओळख गेल्या 70 वर्षात करून दिली नाही आणि करू सुद्धा दिली नाही या वर्गाने, हे वास्तव आहे.
म्हणूनच तुम्ही नानकचंद रत्तू सरांकरवी आमच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला की,…
“मला माझ्या ग्रामीण भागातील समाजाला पुढे आणण्यासाठी सुशिक्षित झालेल्या पिढीवर जबाबदारी देण्याचा विचार करत होतो.परंतु ही पिढी आपल्याच स्वार्थात रममाण झाल्याने माझ्या नजरेसमोर कुणीही दिसत नाही.
म्हणून नानकचंद,हा जो समाजाचा रथ आहे,तो मी एकट्याने ओढत आणलेला आहे.त्या रथाला पुढे घेऊन जाता येत असेल तर न्या.,”अन्यथा त्याला मागे तरी ओढू नका.,”तेंव्हा हा संदेश माझ्या समाजाला जाऊन सांग…माझ्या समाजाला जाऊन सांग…माझ्या समाजाला जाऊन सांग…
बाबा,हा तुमचा शेवटचा संदेश आम्ही या वर्गाने आमच्यापर्यंत कधी पोहचू दिला नाही.पण बाबा आता आम्ही मात्र तुमचा हा शेवटचा संदेश आणि खंत आम्ही समजून घेतला.यापुढे आम्ही तुम्ही स्वतः लिहिलेल्या इंग्रजी ग्रंथातून तुमच्या सर्वप्रकारच्या ज्ञानातून तुमची धम्मक्रांती,संविधानक्रांती अर्थात भीमक्रांती समजून घेण्याचा शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करू…..
बाबा आम्हांला जाणीव आहे की तुम्ही संविधान,बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि इतर ग्रंथ लिहीत असताना तुमच्या पायाला वात येत होता.त्याचा त्रास होऊ नये म्हणून तो पाय तुम्ही उंच एका दोरीला धरून बांधून ठेवत होता….
बाबा,आम्हांला जाणीव आहे की,नानकचंद रात्री बारानंतर घरी निघून गेल्यावर तुम्हाला जर कपाटातून पुस्तकं हवी असतील,मदतीला कुणी नसेल तर,पायाचा त्रास असताना सुद्धा लहान मुलाप्रमाणे रांगत जाऊन ते पुस्तक शोधून आणत असत….
बाबा,आम्हांला जाणीव आहे,की आमची त्यागमूर्ती आई रमाई आणि आपली रामू जेंव्हा आपल्याला सोडून गेली.त्यावेळी तुमच्यावर किती दुःख आले असेल……..
या व अशाच तुमच्या जन्मापासून ते महापरीनिर्वाणापर्यंतच्या काळातील प्रत्येक क्षणी आलेल्या दुःखाची जाणीव ठेऊनच आम्ही तुमच्या स्वाभिमानी समाजाची कल्पना साकार केल्याशिवाय राहणार नाही.
तेंव्हा कोणत्याही लेखकांच्या पुस्तकाशिवाय आणि कोणत्याही केंद्र आणि राज्य सरकारांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथाशिवाय,”केवळ तुम्हीच स्वतः लिहिलेल्या ग्रंथाला वाचून,समजून घेऊनच……
तुमची वैचारिक क्रांती या जगाच्या पटलावर आणल्याशिवाय राहणार नाही.!
त्यासाठी या देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात या मनुवाद्यांनी जो उच्छाद मांडलेला आहे. ज्यामुळे आमच्यावर तिसऱ्या जागतिक अंतिम अणूयुद्धाची जी टांगती तलवार आहे.तीला नष्ट करण्याबरोबरच भारतातील RSS मनुवाद्याना कायमचे संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
हाच आमचा दृढसंकल्प या तुमच्या 135 व्या जयंतीदिनी करत आहोत.हेच तुम्हाला आमचे अभिवादन असेल……


