Home Social जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती...

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी…  — दोन दिवसीय कार्यक्रम उत्साहात संपन्न..‌

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी..‌

       चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      दि.14 ला गावातील मुख्य रस्त्याने महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या प्रतिमांसह मिरवणूक (रॅली) काढण्यात आली. 

        जयभीम चा जयघोष करत डीजे धुमालच्या तालावर थिरकत विहाराचे प्रांगणात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.त्यानंतर महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर,त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. 

       याप्रसंगी अमित भिमटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिक रामटेके यांनी केले व आभार अशीत बांबोडे यांनी मानले.

        दि.15 ला समारोपीय कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध,चक्रवर्ती सम्राट अशोक महान,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

        त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.याप्रसंगी साक्षी अशोक मेश्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.याप्रसंगी गीता मेश्राम,विद्या रामटेके,शुभांगी मेश्राम यांनी राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा व पतिराम मेश्राम यांनी भीमाबाई आंबेडकर यांची प्रतिमा जेतवन बुद्ध विहाराला दान दिली. 

      यावेळी सामाजिक कार्यात तत्पर राहून नव तरुणांना समाज कार्याची प्रेरणा देणाऱ्या समाजातील ज्येष्ठ 14 दांपत्याचा मान्यवर शंकरजी दडमल (उपसरपंच),सोनवणे साहेब व मारोती बहादूरे यांच्या हस्ते शाल,पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिक रामटेके व आभार प्रदीप मेश्राम यांनी मानले.सामाजिक सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, या जयंती उत्सवाला यशस्वी करण्याकरिता समाजातील तरुणाईची कामगिरी नेत्रदीपक होती.याप्रसंगी समस्त बौध्दजन तथा गावकरी उपस्थित होते.