राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कूरखेडा
रामगड ग्रामपंचायत अंतर्गत सन २०२१ ते २६ या कालावधीत विविध विकास कामा करीता उपलब्ध ६३ लक्ष ९४ हजार ५१५ रूपयाचा निधीत मोठी अनियमितता करण्यात आली असा आरोप व या संदर्भात करण्यात आलेला खर्चाचा तपशील माहीतीचा अधिकारात मागूनही संबधिता कडून उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा आरोप आज कूरखेडा विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत रामगड येथील नितीन केरामी व नाजूक दखने यानी केला आहे.
पत्रकार परिषदेत आरोप करण्यात आला आहे की ई ग्राम स्वराज्य पोर्टल वर सन २०२०/२१ ते सन २०२५/२६ पर्यंत वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत जी पी डी पी मध्ये वार्षिक कृती आराखडे अपलोड करण्यात आलेले ठराव विधीग्राह्य ग्रामसभेने तयार केलेले नाही तसेच ग्रामसभेचे कार्यवृंतात व पूर्ण केलेले बांधकामाचे फोटो पोर्टलवर अपलोड करण्यात आले नसल्याचे निदर्शनात येत असल्याने सदर एकूण ६३ लाख ९४ हजाराचा कामात अनियमितता असल्याचा संशय आहे.
तसेच सदर कामाचा कागदपत्राची माहीतीचा अधिकारात मागणी करुनही ग्राम पंचायत अधिकारी अनुसया तूमराम माहीती देण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच याबाबद अपीलीय अधिकारी साहायक बिडीओ उराडे यांचा कडे अपील करूनही व त्यानी ग्रामपंचायत अधिकारी तूमळाम याना ७ दिवसात संबधिताना आवश्यक माहीती उपलब्ध करून देण्याचे निर्देश देऊनही माहीती देण्यास टाळाटाळ होत असल्याने अनियमिततेचा संशय बळावलेला आहे.
या कालावधीत करण्यात आलेल्या कामाची व खर्चाची चौकशी करीत संबधितावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत नितीन केरामी व नाजूक दखने यानी केली आहे. याबाबद जिलाधिकारी गडचिरोली यांचा कडे सूद्धा तक्रार करण्यात आल्याची माहीती त्यानी यावेळी दिली आहे.



