Home देशविदेश या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेत जागतिक बुद्धीजीवी वर्गच या महायुद्धाला कारणीभूत आणि दोषी...

या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेत जागतिक बुद्धीजीवी वर्गच या महायुद्धाला कारणीभूत आणि दोषी कसा व का?  — भाग ०५…..

    मागच्या पाच भागात लेखक इस्राएल / अमेरिका V/S इराण यांच्यातील युद्ध भडकून त्याचे परिणाम जर जागतिक अणूयुद्धात झालेच, तर त्याला हा जागतिक बुद्धीजीवी वर्गच जबाबदार असेल.यात सर्वसामान्य जनतेची कोणतीही चूक नसते. लेखकाच्या त्या मताला बऱ्याच जणांनी बुद्धीजीवी वर्ग जबाबदार असूच शकत नाही,असे मत मांडले.म्हणून त्यावर लेखकाचे स्पष्टीकरण….

           केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून निवड झालेले IAS, IPS, IRS, IFS सनदी अधिकारी आणि राज्य लोकसेवा आयोगाकडून निवड झालेले सनदी अधिकारी आणि कर्मचारी हा बुद्धीजीवी वर्ग या जागतिक महायुद्धाला जबाबदार कसा?

     ” जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ती जमात बनायचे आहे.:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर….

       या वरील आदेशाची आपण दुसरी बाजू तपासून पाहू. दुसरी बाजू म्हणजे ही की शासनकर्ती जमात म्हणजे प्रशासनिक विभागात प्रत्यक्ष काम करणारे UPSC आणि MPSC कडून निवड झालेले सनदी अधिकारी आणि कर्मचारी.

     ” मोक्याच्या जागा पटकवा.” या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आपण तिथे बसलो पाहिजे.

         कारण सत्ताधारी राजकीय पक्ष येतील आणि जातील मंत्रिमंडळ येईल आणि जाईल. परंतू प्रसासनिक सनदी अधिकारी व कर्मचारी वर्ग मात्र कायम तिथे बसलेला असतो ( केवळ बदलीच होईल परंतू कायम तोच वर्ग असतो ). याच वर्गाच्या हातात देशाचा व राज्यांचा संपूर्ण प्रशासनाचा प्रत्यक्ष कारभार असतो.

          थोडक्यात सारांश असा की,मंत्रिपदी बसणारी व्यक्ती सुशिक्षित असलीच पाहिजे ही कांही अट नसते. म्हणून देशाचा व राज्याचा सर्व प्रशासनिक कारभार अगदी शिपायापासून ते सचिव या पदापर्यंतच्या प्रत्येक घटक या प्रशासनिक बुद्धीजीवी वर्गात मोडतो.

           म्हणून या बुद्धीजीवी वर्गाने जर आपली सदसदविवेक बुद्धी सतत जागृत ठेवली असती,त्यात साम,दाम,दंड आणि भेदाच्या कुटनीतीचा अवलंब केला नसता,तर हा देश आणि ही राज्ये 100% संविधानावर चालवून,कोणत्याही नामदाराच्या असंविधानिक आदेशाला न जुमानता जनतेच्या निरागस बाळाला सांभाळण्याचे काम केले असते, तर आज देशाच्या व राज्याच्या विविध समस्यांची निर्मितीच झाली नसती!,हे वास्तव कुणालाही नाकारता येत नाही. 

         या सनदी अधिकारी आणि कर्मचारी बुद्धीजीवी वर्गात बहुतांश महाभाग असे आहेत की ते *पगाराला हातही न लावता आपली लेकरं विदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठवतात!

          याच बुद्धीजीवी वर्गाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या घरावर अँटी करप्शन विभागाने ( जेंव्हा तोडीपाणी जमली नाही ) जेंव्हा धाडी टाकल्या,तेंव्हा ती रोकड आणि संपत्ती मोजण्यासाठी यंत्राचा वापर करून सुद्धा कितीतरी तास लागलेली आहेत.अशी शेकडो उदाहरणे आपल्याकडे आहेत. 

             साधा जळगाव जिल्हा परिषदेचा कारकून असलेला धर्मभास्कर वाघ याची अब्जावधीची संपत्ती कशी जप्त झाली आणि कसा न्यायालयीन कोठडीतच त्याचा मृत्यू झाला. अशी शेकडो उदाहरणे आपल्याला देता येतील.हे का घडत गेले असे?

        तर हा बुद्धीजीवी वर्ग कधीच संविधाननिष्ठ नव्हता म्हणून ( अपवाद वगळता ज्या सनदी अधिकाऱ्याची सतत बदली होत असते. उदाहरणार्थ माजी IAS अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषण यांची एका दिवसात सहा बदल्या झाल्याची नोंद आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंढे असे अपवाद वगळता ) आमच्यावर ही वेळ आलेली आहे. 

           दुसरी विशेष बाब म्हणजे ही,की UPSC आणि MPSC च्या अभ्यासक्रमात विविध अनेक विषय असतील. त्या सर्वप्रकारच्या विषयात हा वर्ग पारांगतही असेल. तेंव्हाच या योग्य उमेदवाराची निवड हा आयोग करतही असेल. परंतू , हा निवड झालेला अधिकारी जेंव्हा खुर्चीत बसतो.ट्रेनिंगमध्ये घेतलेल्या शपथेचा खुर्चीत बसल्यानंतर कायम विसर का पडतो…..?

           तसेच या खुर्चीत बसल्यानंतर वरिष्ठांचा असंविधानिक दबाव आणि राजकारण्यांचा दबाव,या दबावाला बळी न पडता संविधाननिष्ठता जपण्यासाठीचे शिक्षण UPSC व MPSC च्या अभ्यासक्रमात नसते (असता तर बळी पडला असता का?) म्हणून हा बुद्धीजीवी वर्ग या असंविधानिक व्यवस्थेला बळी पडत आलेला आहे. ही त्याची हतबलता असेल असं मी म्हणणार नाही पण त्याचा स्वार्थ जरूर असेल. असंच मी म्हणेन.

           केंद्रसरकारमधील जेवढी खाती आहेत,राज्य सरकारातील जेवढी खाती आहेत, त्या संपूर्ण खात्याचे सचिव आणि सर्व सनदी अधिकारी हे याच बुद्धीजीवी वर्गाचे असतात. म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे देश आणि राज्य चालवीण्याचे रिमोट कंट्रोल याच वर्गाच्या हातात असते

             या जगातील विविध लोकशाहीवादी देशांची परिस्थिती साधारणपणे अशीच असल्याने, तुटीचेच अर्थसंकल्प सादर होत गेल्याने, शिक्षण आणि आरोग्य यावर खर्च न करता संरक्षण विभागावर खर्च जास्तीत जास्त वाढत जाण्याने राजकारण्यांची युद्धाची खुमखूमी वाढत गेली.म्हणूनच या युद्धाचे परिणाम शेवटी जागतिक अणूयुद्धात झालेच तर याला जबाबदार केवळ आणि केवळ हा बुद्धीजीवी वर्गच असेल. सर्वसामान्य जनता कधीच असू शकत नाही!

विशेष सूचना…

          विश्लेषण लेखकाकडे जेवढे ब्रॉडकास्ट ग्रुप आहेत,ज्याच्या आधारे ते 3600 लोकांना प्रत्यक्ष वयक्तिक मो.नं. वर आणि संविधान जागृतीच्या पोस्ट पाठवू शकतात. त्याची मर्यादा केवळ दरमहा 35 असते. आज त्या 35 पूर्ण झाल्याने 31 मार्च पर्यंत विश्लेषक आपल्याला तुमच्या वयक्तिक मो. नं. वर पाठवू शकत नाही.तेंव्हा 31 मार्चपर्यंत याच पोस्टचे पुढील भाग आपण ज्या व्हाट्सअप ग्रुपवर असाल त्या ग्रुपमधून घेऊ शकता…… 

  आवाहनकर्ता आणि संविधान जागृतीचा कृतिशील लेखक…

   अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद,7875452689….