Home देशविदेश ॲट्रॉसिटी ऍक्ट बद्दल संजय शिरसाठ यांनी केलेले विधान चुकीचे अज्ञानी आहे.

ॲट्रॉसिटी ऍक्ट बद्दल संजय शिरसाठ यांनी केलेले विधान चुकीचे अज्ञानी आहे.

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

        ॲट्रॉसिटी ऍक्ट बद्दल संजय शिरसाठ यांनी केलेले विधान चुकीचे अज्ञानी आहे. त्यांना दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि ॲट्रॉसिटी ऍक्ट बद्दल कसलीही समज नाही. 

        ते अनुसूचित जाती असून त्यांना सामाजिक न्याय काय तेच समजलेलं नाही.त्यांच्याकडून बौद्ध आणि अनुसूचित जातीला मोठी अपेक्षा होती.पण दुर्दैवाने त्यांनी सामाजिक अन्यायाची भाषा सुरू केलेली आहे. 

        खोट्या ॲट्रॉसिटी दाखल होतात हे त्यांचं विधान चुकीचे आहे.त्यांच्या अशा विधानामुळे कायद्याचा धाक संपवून दलित आदिवासी धोक्यात येऊ शकतो. 

        ऑल इंडिया पँथर सेना त्यांच्या या भूमिकेचा निषेध करत असून तत्काळ त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी राज्य सरकारकडे करत आहोत.

       सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांना कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही त्यांनी तात्काळ पद सोडावे.ॲट्रॉसिटी ऍक्ट हे एससी/ एसटी चे सुरक्षा कवच आहे. त्याची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे….