राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
पवित्र रमज़ान महिण्यात मुस्लिम बांधव सूर्योदय पूर्वी ते सूर्यास्ता पर्यंत निर्जल उपवास करतात शारीरिक व मानसिक परिक्षा असलेल्या या मुस्लिम उपासक बांधवाना भावनिक दिलासा देण्याकरीता तसेच सामाजिक व धार्मिक सौहार्दाचा संदेश देण्याकरीता येथील बौद्ध समाज मंडळाचा सदस्यानी ईशा ही दिवसाची अंतिम नमाज पठनानंतर येथील जामा मस्जिद मध्ये पोहचत मुस्लीम बांधवाना थंडपेय लस्सीचे वितरण केले.
कूरखेडा नगरी सामाजिक व धार्मिक सलोख्यात कार्यक्रम करीता सूपरिचीत आहे,येथील सर्व जातीय सर्व धर्मिय बांधव एकमेकांचा सण उत्सवात सहभागी असतात राज्यात,देशात जातीय धार्मिक तानतनावाचा घटणा घडत असल्यातरी येथील जूण्या पीढीने शहराचा सौहार्दपूर्ण वातावरणाला कधीच तडा जाऊ दिला नाही नविन पीढी सूद्धा ही परंपरा कायम राखत आहे येथे ईद,पैगंबर जयंती,राम नवमी, हनूमान जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त काढण्यात येत असलेल्या मिरवणूकीत सर्व धर्मिय नागरीक सहभागी असतात काल रात्री मुस्लिम उपासक बांधवा करीता बौद्ध समाज मंडळाचा वतीने लस्सी वितरण करीत येथील सौहार्दपूर्ण परंपरेत भर टाकण्यात आली.
याप्रसंगी बौद्ध समाज मंडळाचे रोहीत ढवळे,प्रमोद खोब्रागडे, रमेश नंदेश्वर, नितेश खोब्रागडे,राजू टेभूंर्णे,अरूण वालदे,रवि सहारे,राहूल टेंभूर्णे,सोहम पाटील,वेदांत खोब्रागडे,सम्यक राऊत,विशांत खोब्रागडे,शांतनू खोब्रागडे तथा समस्त बौद्ध समाज मंडळाचे सदस्य हजर होते.



