Home Social जामगाव येथील गुप्ता राईस इंडस्ट्रीजकडून सामाजिक बांधिलकी; ‘दिव्य वंदना आधार फाउंडेशन’ला तांदळाची...

जामगाव येथील गुप्ता राईस इंडस्ट्रीजकडून सामाजिक बांधिलकी; ‘दिव्य वंदना आधार फाउंडेशन’ला तांदळाची मदत…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

        स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील नामवंत संस्था गुप्ता राईस इंडस्ट्रीज (काँफा) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्य वंदना आधार फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला तांदळाची भरीव मदत करण्यात आली.

        दिव्य वंदना आधार फाउंडेशन ही संस्था गरजू आणि वंचितांसाठी सातत्याने कार्यरत असते.संस्थेच्या या सेवाकार्याची दखल घेत गुप्ता राईस इंडस्ट्रीजने मदतीचा हात पुढे केला. 

       या मदतीमुळे फाउंडेशनच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या अन्नदान व इतर उपक्रमांना मोठे बळ मिळणार आहे.

         या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिव्य वंदना आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पसारकर यांनी महेंद्र भाऊ यांचे विशेष आभार मानले.

       “समाजातील दानशूर व्यक्ती आणि उद्योजकांच्या पाठबळामुळेच आम्ही आमचे सेवाकार्य अविरत सुरू ठेवू शकतो,” अशा भावना शुभम पसारकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

        गुप्ता राईस इंडस्ट्रीजच्या या स्तुत्य उपक्रमाचे चिमूर तालुक्यातील मौजा जामगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.