राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
आज आमदार तथा माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात मुंबई राजभवनात नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सर्वपक्षीय आदिवासी आमदार शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेऊन भगवान बिरसा मुंडा प्रतिमा भेट दिली.
तसेच जनजाती सल्लागार परिषदेच्या नियमित बैठका, शासकीय रिक्त पदभरती, पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत योग्य चर्चा करण्यात केली.
यावेळी महोदयांनी “आपण देखील आदिवासी समाजातून असल्याने समस्या समजून घेऊन निराकरणासाठी चर्चा आणि क्षेत्र भेटी घेणार.” अशी ग्वाही दिली.



