रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर तालुक्यात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले असल्यामुळे कोळसाचे व इतर ट्रक खुप मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपळनेरी रोड वर वडाळा वस्ती मध्ये कोळशाने भरलेला ट्रक चा अपघात झाला,तसेच भिसी मध्ये अपघात झालेला असल्याने अपघाताला आळा घालण्याकरिता वाहतूक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
तेव्हा या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी आज दिनांक 11 मार्चला चिमूर येथे ठाणेदार दिनेश लबडे यांना भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बालू पिसे यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,मोठ-मोठे ट्रक मुख्य रस्त्यावर अवैध पार्किंग करतात,शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी भरधाव वाहने चालवितात,ज्यामुळे अपघातास ते कारणीभूत ठरू शकते.
अवैध वाहतुकी अंतर्गत अपघाताचे प्रमाण वाढू नये,रोडवर पाहिजे तिथे ब्रेकर लावावे,नो-पार्किंग झोन मध्ये असणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करावी,पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर तालुका च्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष बालू पिसे यांनी सांगितले.
निवेदन देताना भाजपचे बंटी वनकर,नगर सेवक प्रशांत तळवेकर,संदीप पिसे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा नेरी मंडळ अध्यक्ष,प्रतीक बादके,ईश्वर डुकरे,हरीश पिसे,पवन इंगोले,महेश हजारे,अक्षय हजारे,आदित्य कड़ू,राकेश साठोणे आदी उपस्थित होते.



