शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुक्यात राष्ट्रीय कांग्रेस पक्ष मजबूत होता आणि यापुढेही राहील.यामुळे कोण कुठे जातात,यापेक्षा आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहोत आणि राहू व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मजबूत ठेवू असा आशावाद चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम सेलवटकर यांनी व्यक्त केला आहे.
संधीसाधू नेत्याची गटबाजी होती,त्यामुळे पक्षात एकवाक्यता नव्हती.गटबाजी करणारे भाजपावासी झाल्यामुळे कांग्रेसच्या कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झालेला असून कांग्रेसचे नेते,माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या मार्गदर्शनात येत्या काळात पूर्ण तालुका पिंजून काढून जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना उभारी देऊन कांग्रेस बळकट होईल हे लक्षात घेतले पाहिजे,असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर आघात झाले व होत राहतील.पण पुरुन उरणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व असल्याने जाणेवाल्यांचा विचार करण्याची गरज नाही असे रोखठोक मत शांताराम सेलवटकर यांनी व्यक्त केले आहे.



