Home Social ग्रामदैवत पीरसाहेब बाबांच्या यात्रेसाठी हजारो भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद….

ग्रामदैवत पीरसाहेब बाबांच्या यात्रेसाठी हजारो भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद….

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी…

       पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथेल पिरसाहेब यात्रा (उरूस) सालाबाद प्रमाणे,यात्रेच्या निमित्ताने,”देवाचा मानाचा घोडा घेऊन छबिना सोहळा व संपूर्ण गावातून ग्राम प्रदक्षिणा घेऊन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडला. 

         या प्रसंगी गावासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लाऊन दर्शनाचा लाभ घेतला.

          छबिना मिरवणूक पारंपरिक हलगी व लेझीम वाद्याच्या गजरात,फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि जयघोषात गावातून ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली.

           मिरवणुकीत विविध आकर्षक देखावे,रोषणाई आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.भाविकांनी श्रद्धेने चादर अर्पण करून पिरसाहेब बाबा यांच्या चरणी प्रार्थना केली.मंदिरातील पीरसाहेब देवाला यावेळी महानैवद्य देण्यात आला.

         यात्रे निमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम,तसेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.पिंपरी बुद्रुक समस्त ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या सहकार्याने मुख्य उरूस कार्यक्रम दुसऱ्या दिवशी शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

       मुख्य उरूसच्या दुसऱ्या दिवशी मेवा,मिठाई,खेळणी, झोका व विविध क्षेत्रातील खेळ मोठमोठे स्टॉल लावण्यात आले होते.यामुळे यात्रेला मोठे स्वरूप आलेले आहे. 

        यात्रेकरू महिला भगिनी व भाविक भक्त हर एक वस्तू व मेवा मिठाई खरेदी करण्यासाठी दंग झालेले पहावयास मिळत आहेत आहेत. 

        पंचक्रोशी परिसरातून यात्रेसाठी आलेल्या भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय,इलेक्ट्रिक प्रकाशाची सोय,स्वच्छता,तसेच इतर सोयीसुविधांची व्यवस्था मोठ्या प्रमाणात पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच,उपसरपंच,माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,साखर कारखान्याचे संचालक,पोलीस पाटील,चेअरमन,व्हाईस चेअरमन,विविध संस्थांचे अध्यक्ष,ग्रामसेवक सह ग्रामपंचायत कर्मचारी आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने यात्रेचे सुनियोजित नियोजन करण्यात आलेले आहे.

       देवाचा छबिना सोहळ्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.