बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी….
इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे पिरसाहेब बाबांच्या मंदिरात यात्रे निमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन दर्शनही घेतले.यावेळी पीरसाहेब बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वादही घेतला.
सदर यात्रे निमित्त मंदिराच्या भेटी दरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत आसताना म्हणाले की,पिरसाहेब बाबांच्या आशीर्वादाने माझा बळीराजा शेतकरी सुखी-समृद्धी आणि समाधानी होऊ दे,यंदाच्या वर्षी मेघराजाने चांगलीच साथ देऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे,अशी पर्थना पिरसाहेब बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
यावेळी यात्रा कमिटी व गावच्या वतीने चेअरमन व प्रगतशील बागायतदार,बबन बोडके यांच्या हस्ते फेटा,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सन्मानही करण्यात आला.
भेटीदरम्यान विद्यमान सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील,विविध संस्थांचे चेअरमन,व्हाईस चेअरमन,यात्रा कमिटीचे पदाधिकारी,तरुण कार्यकर्ते व पिंपरी बुद्रुक समस्त ग्रामस्थ,नागरिक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांनी पीरसाहेब मंदिर परिसरात काही वेळ देऊन उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.तसेच सर्वांच्या जीवनात सुख,शांती आणि प्रगती नांदो अशी प्रार्थनाही केली.
पीरसाहेब बाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गावातील उपस्थित ग्रामस्थांना शुभेच्छा देत प्रत्येक समाज हा ऊरूसा निमित्त एकत्रित,आसतो हे पिंपरी बुद्रुक गावातच पहावयास मिळते,याबद्दल सर्वांचे कौतुकही केलेच पाहिजे.
हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीबद्दल गावच्या वतीने हभप बाळासाहेब घाडगे यांनी आभार व्यक्त केले.



