Home Political चिमूर तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…‌ — वारजुकर...

चिमूर तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…‌ — वारजुकर बंधूनी चिमूर विधानसभा क्षेत्रातंर्गत काँग्रेस पक्षात पाडली मोठी खिंडार…

      रामदास ठुसे

 नागपूर विभागीय प्रतिनिधी… 

       चिमूर विधानसभा क्षेत्रात डॉ.सतीश वारजुरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आजतागायत टिकून राहिला.

       एकेकाळी डॉ.सतीश वारजुरकर व आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्यात राजकीय क्षेत्रात वादंग राहायचे,एकामेकावर जोरदार टीका करायचे.

       काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यावर वारजुरकर टीकास्त्र सोडायचे.

               मात्र,आता स्वतः वारजुरकर बंधूंनी,आ.बंटीभाऊ भांगडिया यांच्या पुढाकारातंर्गत भाजप पक्षात रीतसर प्रवेश केला असल्यामुळे,विरोधकच आता भाजपाचे तारणहार बनले आहेत. 

       यामुळे चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक ठिकठिकाणी विविध चर्चेला पेव फुटले असून,जिकडे तिकडे वारजुरकर बंधूंचे चर्चा ऐकायला मिळत आहेत. 

       वारजूकर बंधूंच्या भाजप प्रवेशामुळे आता विधानसभा क्षेत्रात अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुद्धा भाजपात पक्ष प्रवेश होत आहे.

             नुकतेच नागपूर येथे चिमुर विधानसभा क्षेत्राचे आ.किर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वात तथा माजी आ.मितेश भांगडीया यांच्या प्रमुख हस्ते आणि चिमुर येथील माजी आ.तथा खनिकर्म विकास महामंडळाचे माजी राज्यमंत्री डॉ.अविनाश वारजूकर,माजी जि.प.अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर,भाजपा जिल्हा अध्यक्ष हरिष शर्मा,शंकरपूरचे सरपंच साईश सतीश वारजूकर,तसेच पलश अविनाश वारजूकर यांच्या प्रमुख उपस्थितीत,चिमुर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजपात रीतसर प्रवेश केला आहे….