रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी…
चिमूर/- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागा द्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 58 व्या पुण्यतिथी महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ दिपक यावले होते.मार्गदर्शन गुरुदेव भक्त प्रा.राम राऊत होते.
प्रा.राम राऊत यांनी ध्यान विषयाचे महत्त्व विशद केले.सोबतच गांधी सेवा शिक्षण समितीचे कोषाध्यक्ष प्रा.महादेवराव पिसे यांनी उपस्थितांना मार्गदशन केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित भजने सादर करण्यात आली.कार्यकारी प्राचार्य डॉ.प्रफुल्ल बन्सोड,प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.पितांबर पिसे यांनी केले.कार्यकम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभाग प्रभारी प्रा.डॉ.नितिन कत्रोजवार,प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे,प्रा.गुणवंत वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
मौन श्रद्धांजली कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली.



