गेल्या 80 वर्षात रशिया आणि अमेरिका यांच्यातील खुमखुमीच जगाला नष्ट करण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याच्या चार उदाहरणापैकी एक उदाहरण आपण पाहिले. परंतू आज 2026 मध्ये पुन्हा त्या चार पेक्षा जास्त शक्यतांचे युद्ध होण्याचे संकेत मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.
त्याच्या अनेक कारणापैकी एक प्रमुख कारण हे आहे की, हा जो एकविसाव्या शतकातला बुद्धीजीवी वर्ग आहे तो त्याला जास्तीत जास्त कारणीभूत आहे.
बुद्धीजीवी वर्ग म्हणजे कोणता? याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. लोकशाहीत सर्वसामान्य जनता ही निरागस बाळासारखी असते. ती कशीही वागली, तरी तीचा दोष अजिबात नसतो. कारण तीला घडवल्याचे श्रेय याच बुद्धीजीवी वर्गाला दिलेच पाहिजे आणि तीला बिघडवल्याचे खापर याच बुद्धीजीवी वर्गांवर फोडले पाहिजे.
बुद्धीजीवी वर्गाच्या व्याख्येत डॉक्टर ( पी. एच. डी. ), प्राध्यापक, साहित्यिक ( कवी, लेखक ), पत्रकार, शिक्षक, वकील, न्यायाधीश, न्यायमूर्ती, IAS, IPS, IFS, IRS, UPSC ग्रेडचे सर्व तसेच MPSC सारख्या ग्रेडचे सर्व सनदी अधिकारी आणि कर्मचारी, सर्व क्षेत्रातील अभियंते, सामाजिक संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते आणि दबाव गटातील नेते. ही वरील सर्व मंडळी बुद्धीजीवी वर्गात मोडतात. यांनाच देशातील व्यवस्थेचे सर्व ज्ञान असतेच नव्हे असायलाच पाहिजे. की सर्वसामान्य निरागस जनता अन्न, हवा , पाणि या अत्यावश्यक गरजांच्या, सकस आहार, शुद्ध पाणि आणि निवारा या आवश्यक गरजांच्या, सुखाच्या गरजेच्या, विलासाच्या गरजेच्या पूर्ततेच्या कोणत्या उंबरठ्यावर सर्वसामान्य जनता आहे. शिवाय शेवटच्या नागरिकापर्यंत त्या गरजेची पूर्तता होत आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या बुद्धीजीवी वर्गाला चांगली ठाऊक असतात.
“घटनात्मक नीतीचे पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही” :– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ही जी घटनात्मक नीती आहे, ती नीती चांगल्या प्रकारे या बुद्धीजीवी वर्गाला ठाऊक असते. परंतू , शीला विना विद्या फुकाची :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आणि “Education Without Charactor अर्थात चारित्र्याशिवाय शिक्षण हे फार मोठे महापाप आहे :- म. गांधी
म्हणूनच, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो कुणी प्राशन करील, तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वरील प्रकारच्या व्याख्येतच हा बुद्धीजीवी बसत असतो. या जगातील बुद्धीजीवी वर्गाने त्या त्या देशाच्या व्यवस्थेत जेंव्हा विविध पदावर राहून जबाबदारीने नैतिक आणि घटनात्मक नीतीचे कर्तव्य पार पाडत असतात.
याशिवाय राजकीय सत्तेच्या खुर्चीत बसणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते नगरसेवक, आमदार, खासदार, नामदार, राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपतीपर्यंतच्या सर्वच प्रतिनिधीना आपल्या शीलासहित असलेल्या विद्येची अंमलबजावणी करून वरील सत्ताधारी वर्गाला देशाच्या संविधानावर 100% देश चालविण्यास भाग पाडण्याचे नैतिक कर्तव्य हे बुद्धीजीवी वर्गाचे असते. तेंव्हाच ती लोकशाही, तो विज्ञानवादी मानवता धर्म विकसित होऊन तो देश निसर्ग नियमावर आधारित मार्गानेच चालत असतो.
या एका देशाच्या मार्गक्रमणाचा आदर्श घेऊन त्याचा शेजारील देश त्याचेच अनुकरण करतो. असे करत करत संपूर्ण खंड हा आदर्श लोकशाहीवादी बनल्यानंतर इतर खंड सुद्धा त्या खंडाचा आदर्श घेऊन संपूर्ण विश्व लोकशाहीवादी आणि मानवताधर्मवादी बनून निर्जीव सृष्टीच्या साहाय्याने संपूर्ण सजीव सृष्टीचे कल्याण साधत साधत संपूर्ण विश्व कल्याणकारी ठरायला हवे होते……!
परंतू तसे झाले नाही. कारण 1945 पर्यंत महाविनाशकारी दुसऱ्या महायुद्धातुनच सर्व जगाने यातून सावरायला हवे होते. विशेष करून या बुद्धीजीवी वर्गाने सावरायला हवे होते……..!
परंतू , गेल्या 80 वर्षात याच बुद्धीजीवी वर्गाने चिंतन करून, स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीने अंतर्मुख होऊन जर नैतिक कर्तव्य पार पाडले असते, तर आपोआपच घटनात्मक नीतीचे पालन होऊन आज आपल्या देशाची *लोकशाही आणि संविधान* अविष्कारीत झालेली दिसली असती. आणि आज जे 24000 अणुबॉम्बवर जग झोके घेते आहे. कदाचित ही परिस्थितीच निर्माण झाली नसती.
अल्बर्ट आईन्स्टाइन, डॉ. ओपन हायमर, डॉ.लीनस पाऊलिंग* यांनी पुढाकार घेऊन जे दोन अणुबॉब युरेनियमपासून 1945 मध्ये बनवले नसते आणि त्याची अंमलबजावणी केली नसती, तर हिटलर शरण येऊन आत्महत्या केलाच नसता आणि दुसरे महायुद्ध थांबलेच नसते. म्हणून काही वरील शास्त्रज्ञ दोषी आहेत. असं अजिबात नाही की त्यांनी अणुबॉम्ब बनवलाच नसता तर हिरोशीमा आणि नागासाकीचा विधवन्स झालाच नसता, हे म्हणने हास्यास्पद आहे. कारण कोणतेही संशोधक व शास्त्रज्ञ् हे मानवी कल्याणाचाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच शोध लावत असतात. आर्यवंशीय विकृत हिटलरला थांबवून जगाला त्याच्या विनाशापासून वाचवणे हाच उद्देश त्यांच्यासमोर होता. म्हणून अणुबॉबची निर्मिती झाली. शिवाय या युरेनियम पासून केवळ अणूबॉम्बच बनतो असे नव्हे तर, या *युरेनियम* पासून वीजनिर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकते की, साध्या पेन्सिल एवढे युरेनियम संपूर्ण मुंबई शहराला एक वर्षभर वीज पुरवू शकतो…..!
अशी वैज्ञानिकांनी मानवतावादी क्रांती करून ठेवलेली आहे. परंतू आमच्या बुद्धीजीवी वर्गाने ही आणि अशी विविध प्रकारची महापुरुषांची वैचारिक क्रांती शेवटच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत नैतिक कर्तव्य आणि आचरणातून पोहचवली नाही. म्हणून आज आमचे जग तिसऱ्या अंतिम जागतिक अणूयूद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे…….
म्हणूनच आज 2026 च्या काळात जे युद्ध छेडल्या गेले आहे. ते जर वाढत जाऊन अणूयुद्धात रूपांतरित झाले तर, याला जबाबदार अप्रत्यक्षरित्या हा *बुद्धीजीवी* वर्गच असेल…………!!!
या लेखाचा पाचवा भाग उद्याच्या भागात…….


