A) व्यवस्थेचे मुख्य प्रकार दोन
1.विषमता 2.समता
B) व्यवस्थेचे अप प्रकार पाच
1.आर्थिक व्यवस्था 2.सामाजिक व्यवस्था 3.राजकीय व्यवस्था 4.धार्मिक व्यवस्था 5.सांस्कृतिक व्यवस्था.
C ) विषमतेचे पाच प्रकार
1.आर्थिक विषमता 2.सामाजिक विषमता 3.राजकीय विषमता 4.धार्मिक विषमता 5.सांस्कृतिक विषमता.
D ) समतेचे पाच प्रकार
1.आर्थिक समता 2.सामाजिक समता 3.राजकीय समता 4.धार्मिक समता 5.सांस्कृतिक समता.
E ) आर्थिक विषमता म्हणजे वर्गीय समाज. 1.दरिद्री रेषेखाली 2.गरीब 3.कनिष्ठ मध्यम
( चतुर्थ श्रेणी,तृतीय श्रेणी कर्मचारी,सीमांत शेतकरी पाच एकरचे खालील ). वरिष्ठ मध्यम वर्ग ( क्लास वन,क्लास टू अधिकारी,1o एकरचे वरचे शेतमालक,( शेतकरी नव्हे, कुळ किंवा प्रत्यक्ष शेती करणारा मालक किंवा श्रमिक ) .
श्रीमंत आणि गर्भ श्रीमंत .गर्भश्रीमंत म्हणजे मोठमोठे भांडवलदार,उद्योगपती,कारखानदार,50,100,500 एकर चे जमीनदार,
असा हा वर्गीय समाज म्हणजे आर्थिक विषमता होय,आणि वर्गविहीन ( वर्ग नसलेला ) समाज म्हणजे आर्थिक समता असलेला समाज,व्यवस्था होय.आर्थिक समतेची व्यवस्था होय.
2.सामाजिक विषमता : म्हणजे जातीय व्यवस्था आणि त्यातील भेदभाव,वरिष्ठ कनिष्ठ,उच्चनीचता.स्पृश्य अस्पृश्यता असलेला समाज म्हणजे सामाजिक विषमतेची व्यवस्था होय.तसेच जातीविरहित ,भेदभाव विरहित समाज ,म्हणजे ज्या समाजात,देशात जाती आणि तिचे प्रकार, उप प्रकार नाहीत असा देश असा समज म्हणजे सामाजिक समतेची व्यवस्था असलेला देश आणि समाज.
राजकीय विषमता : म्हणजे राजकारणात सत्तेत फक्त श्रीमंतनाच संधी असते,गरीब माणूस निवडणूक लढवून सत्तेत येत नाही,अशी अवस्था,तसेच ज्याच्या जातीची संख्या जास्त,म्हणजे मोठ्या जातीचा च माणूस निवडून येतो,अल्पसंख्य जातीचा उमेदवार निवडणूक हरतो,कारण जातिवाद आणि जाती व्यवस्था.म्हणून सत्ता ही एक तर गर्भश्रीमंतच्या हाती किंवा मोठ्या जातीच्या हाती असणे,याचा अर्थ राजकीय व्यवस्थेतील गरीब श्रीमंत,आणि बहुसंख्यांक अल्पसंख्याक जात हा भेदभाव म्हणजेच राजकीय विषमता होय.हा भेदभाव नसलेली व्यवस्था म्हणजे राजकीय समता होय.
धार्मिक विषमता: धर्मातील गुत्तेदारी, ठेकेदारी म्हणजे मठाधिपती जे 50 100 एकराचे मालक,राजवैभवी जीवन जगणारे ऐतखाऊ पुजारी,पुरोहित आणि देव धर्माच्या नवस सायास चे नावाने,भक्ती चे नावाने देवभोळ्या , अज्ञान, अडाणी, भक्तांचे आर्थिक मानसिक शोषण करणारे महाराज,भोंदूबाबा.यांचा एक वर्ग आणि ज्यांची पिळवणूक होते असा एक भक्त गण अशी ही धर्मातील विषमता म्हणजेच धार्मिक विषमता होय.आणि ज्या देशात समाजात हे ऐतखाऊ, भोंदू, महाराज यांचे अस्तित्व नाही,जिथे देवळे प्रार्थना स्थळे आहेत पण तिथे पुरोहित,पुजारी, मुल्ला मौलवी, फादर नाहीत,मठाच्या ,देवस्थानच्या नावाने जमीन बिल्डिंगी नाहीत,धन संपती सारी सरकारच्या मालकीची आहे,आणि सरकार पगार देऊन पुरोहित नेमत, ज्यांना रिटायरमेंट असते अशी देवस्थाने असलेला देश आणि समाज म्हणजे धार्मिक समता होय.
सांस्कृतिक विषमता: ज्या देशात आणि देशातील समाजात खानपान,वेशभुषा, भाषा,प्रांत,लिंगभेद, वंश भेद केल्या जाते ,यानुसार बंधने असतात,स्वातंत्र्य नसते,अशी व्यवस्था म्हणजे सांस्कृतिक विषमता होय.आणि ज्या देशात,समाजात या बाबतीत स्वातंत्र्य असते,सरकारचे आणि जातीचे धर्माचे बंधन नसते,असा देश आणि समाज म्हणजेच सांस्कृतिक समता असलेली व्यवस्था होय.
थोडक्यात असे की,कोणत्याही क्षेत्रात जेव्हा श्रेष्ठ कनिष्ठ,उच्चनीच, लहान मोठा,वरचा खालचा,पवित्र अपवित्र ,गरीब श्रीमंत असा भेदभाव असलेला समाज आणि त्याची संस्कृती असते तिथे विषमता असते,आणि अशी भेदभावाचे विचार,श्रद्धा,भक्ती,निष्ठा असलेली माणसे नसतात,तिथे समता नांदते,स्वातंत्र्य आणि बंधुभावाचे वातावरण असते,अशाच व्यवस्थेत न्याय मिळतो.म्हणजेच जशी व्यवस्था तशी अवस्था,तसे परिणाम.


