Home Maharashtra वृत्त प्रकाशित होताच श्रीराम नगर पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्तीला सुरुवात..‌. —...

वृत्त प्रकाशित होताच श्रीराम नगर पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्तीला सुरुवात..‌. — “दखल न्यूज भारतचा, दणका…

     राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

        श्रीराम नगर परिसरात फुटलेल्या पाणी पुरवठा पाईपलाईनमुळे नागरिकांना मागील आठ दिवसांपासून पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. 

       या संदर्भात,”दखल न्यूज भारत मध्ये,वृत्त प्रकाशित झाल्यानंतर,वृत्ताची नगरपंचायत कुरखेडा पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी तातडीने दखल घेतली व पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त करण्यास सुरुवात केली.

        वृत्त प्रसिद्ध होताच,नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांनी श्रीराम नगर येथे जाऊन दुरुस्ती करिता खोदुन ठेवलेली पाईपलाईन अंतर्गत दुरुस्तीचे काम त्वरीत सुरू केले. 

       सध्या खोदकाम करून ठेवलेल्या जागी पाईप लाईन दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून लवकरच परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

       स्थानिक नागरिकांनीही,”दखल न्यूज भारत,वृत्ताची दखल घेऊन तातडीने काम सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.