युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- शालवन विहार बडनेरा येथे जागतिक महिला दीन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बहुजनांच्या आदर्शाचे पूजन, त्रिरत्न वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उषा दादाराव इंगळे, मार्गदर्शक म्हणून संगिता सूरज मंडे, कुमुदिनी लोकेश मेश्राम, कांचन वीर धम्मपिठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्षा वंदनाताई घोड़ेस्वार यांनी तर प्रास्ताविक कीर्तिताई प्रकाश बनसोड यांनी आणि आभार प्रदर्शन रत्ना वाहने यांनी पार पाडले.
महिला दिनानिमित्य संगिता सूरज मंडे यांनी महिलांचे कायदेविषयक अधिकार याविषयी भाष्य केले. कुमुदिनी लोकेश मेश्राम यांनी महिला, कुटुंब आणि संस्कार याविषयी कथन केले. कांचन वीर यांनी महिलांचे सामाजिक कार्य याविषयी भाष्य केले तर गजवंती सुभाष विघ्ने यानी जागतिक महिला दिनाचा इतिहास कथन केला. उपस्थित सर्व वक्त्यांनी महिलांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. महिलांना जुना दृष्टिकोण बदलण्याचा व स्वाभिमानी जिवन जगण्याचे आवाहन करण्यात आले. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे यशस्वीते करिता पुष्पलता मेश्राम, विमल ओगले, मनोरमा शेंडे, वंदना खोब्रागडे, शोभा टेम्भूरने, विजया बनसोड, सुजाता बोरकर, रंजना तायड़े, इंदू घोड़ेस्वार, वंदना ऊके, चन्द्रकला कांबळे, सुनंदा मेश्राम, गंगा डोंगरे, कीर्ति बनसोड, बेबि रामटेके, पुष्पा संभारे, मंदाकीनी शृंगारे, मंदा भैसारे, लता जेठे, सविता कावरे, शोभा चव्हाण, वर्षा चोपड़े, जयश्री गणविर, सुधा गेडाम, उज्वला डोंगरे, जयश्री वाहने, उषा प्रल्हाद इंगळे, छाया इंगोले, बबिता लेन्डे, शारदा खोब्रागडे, निर्मला बनसोड, शिला देशभ्रतार, वंदना रहाटे, छाया बनसोड, पिंगला उगले, माया बोरकर, मिरा लेन्डे, सुजाता जामनेकर, कोकिळा तायडे, राणी हिम्मत खंडारे, सुमित्रा मोहोड़, रंजना विलास तायडे, निर्मला रविंद्र बनसोड, सविता मेश्राम, चंदा विनायक तसरे, लता राजेश ढोके, शोभा सुखदान, ममता नरेंद्र गजभिये, शिल्पा वाघमारे आणि याशिवाय पुरुष मंडळीमध्ये संस्थेचे अध्यक्ष सुनिल टेम्भूरने, माजी स्थाई समिति सभापति प्रकाश बनसोड, संस्थेचे सचिव के. टी. मेश्राम, प्रह्लाद इंगळे, सूरज मंडे, लोकेश मेश्राम, दादाराव चव्हाण, राजेश ढोके, सुरेश घोडेस्वार, प्रबुध्द जामनेकर, राकेश मेश्राम, महेंद्र मेश्राम, मदन मेश्राम, राजेंद्र रामटेके, यांचेसह बहुसंख्य विद्यार्थी, उपासक, उपासिका व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.



