रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर शहरात,छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव ६ मार्च २०२६ रोज शुक्रवारला तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत झुरमुरे सहा.शिक्षक अडेगांव (देश ) हे होते तर उद्घाटक म्हणून चरणदास पोईनकर महाराज मालेवाडा हे आवर्जून उपस्थित होते.
विशेष अतिथी प्रा.डॉ.चद्रभान खंगार,प्रमुख पाहुणे म्हणून विलास डांगे,एकनाथ शिंदे शिवसेना तालुका प्रमुख धर्मसिंग वर्मा,डॉ वसंतराव झोडे,तानाजी सहारे,जावेद पठाण,सचिन अगडे,राहुल शंभरकर,शितल ताई सोनवाने,किशोर उरकुंडे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले,त्यांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास डांगे यांनी केले.
अध्यक्ष श्रीकांत झूरमुरे, उद्घाटक पोईनकर महाराज,डॉ. चंद्रभान खंगार यांनी छत्रपती शिवाजी महाराज (१९ फेब्रुवारी १६३० – ३ एप्रिल १६८०) हे महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श राजे होते,जिजाऊ आणि शहाजीराजांच्या पोटी शिवनेरीवर जन्मलेल्या शिवरायांनी १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
प्रजेचा कैवारी,पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेला असा हा राजा,ज्याने १६७४ मध्ये रायगडावर राज्याभिषेक करून ‘छत्रपती’ राजे ठरलेत.
अनेक पराक्रमाच्या गाथा आपल्या विचारातून व्यक्त केल्या.मान्यवरांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी करिता वैभव डांगे,नंदकुमार कामडी चिमूर शहर उपप्रमुख,वामन बंडे नेरी पंचायत समिती उपविभाग प्रमुख यांनी योगदान दिले.
सायंकाळी ६:०० वाजता श्रीहरी बालाजी महाराज यांच्या पटांगणातून भव्य शोभा यात्रेला सुरुवात झाली.ही शोभायात्रा डोंगरवार चौक,शिवाजी चौक,कावरे चौक चावळी चौक,लालकृष्ण-अटल बिहारी चौक,बस स्थानक,हुतात्मा नेहरू चौक,अतंर्गत फटाक्यांची आतिश बाजी करीत शोभायात्रा निघाली.
या शोभायात्रेत खांबाडा,हरणी,शिरपूर,बोरगाव बुटी,तळोधी नाईक,मेटेपार ,मांगल, गाव,आंबेनेरी,पारडपार, टिटवी,मालेवाडा या भजन मंडळांनी सहभाग घेतला होता.
यादरम्यान विलास डांगे यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन भंजन मंडळांचा सत्कार करण्यात आला.या यात्रेत बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज,संत गाडगे बाबा,महात्मा गांधी,यांच्या वेशभूषा करून ते यात्रेचे केंद्रबिंदू ठरले.
श्रीहरी बालाजी देवस्थानाचे अध्यक्ष निलम राचलवार,पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस विभागाचे सहकार्य लाभले.या उत्सवात मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.



