शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर तुकूम स्थित राणी राजकुवर शाळा जवळील प्रांगणात रविवार दि.८ मार्चला जागतिक महिला दिन उत्साहात व थाटात पार पडला.या कार्यक्रमाचे आयोजन चंदा बाबाराव जिवतोडे,चंदा प्रदीपराव इटनकर,अर्चना ठाकरे व मीना नरेंद्र वैद्य यांनी केले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष कसामगोट्टूवार,राहुल विरुटकर,श्रुती घाटे,सरला कुळसंगे,डॉ.आसावरी देवतळे,डॉ.उज्वला चव्हाण,जयदीप रोडे,अमर सिंग राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
अपंग महिला व निराधार महिलांना साडी चोळी देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले या शिवाय डान्स,संगीत खुर्ची,प्रश्न मंजुषा आदि कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुक्रमे चैताली नवले व चंदा जिवतोडे यांनी केले.उपरोक्त कार्यक्रमाला मंजुश्री कासमगोट्टूवार,सिरीज पतरंगे,बाबाराव जिवतोडे,संजु चांदेकर व या प्रभागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येंने उपस्थित होते.



