शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्या अंतर्गत येणाऱ्या येरगांव गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांत ग्राम पंचायत विषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे.
पिण्याचे पाणी ही मुलभुत व आवश्यक गरज असून या गावात असलेल्या एकमेव विहीरीचे पाणी आटले असून सध्या याच गावात उभ्या असलेल्या चार बोरिंग बंद अवस्थेत आहे.
ग्राम पंचायत ही बुध्दीपुरस्पर या कडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महादेव नागापूरे,राजू नागापूरे व उमेश फूलझेले यांनी केला आहे.दरम्यान आज एका शिष्टमंडळाने पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी, तहसिलदार मृदूला मोरे व उपविभागीय पाणी पुरवठा विभाग यांच्या कडे निवेदन देऊन त्यांचे या मागणीकडे लक्ष वेधले आहे.
येरगाव मधील पाणी समस्या तातडीने सोडवून गावकऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा अशी रास्त मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.




