ऋषी सहारे
संपादक
आरमोरी तालुक्यातील नागरीकांना शासकीय योजनाचा लाभ घरपोच मिळावा, या हेतुन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हे अभियान तालुक्यात राबविण्यात येणार आहे. तहसिल कार्यालय आरमोरी यांच्या वतीने तालुक्यातील चार मंडळामध्ये शिबीरे भरविण्यांत येणार आहेत.
वैरागड येथे दिनांक 7 मार्च, देऊळगांव 14 मार्च, पिसेवडधा 10 एप्रिल व आरमोरी 8 मे, 2026 रोजी शिबीराचे आयोजन करण्यांत येणार आहे.
शिबीरामध्ये महसुल विभागासोबतच पंचायत समीती, भुमी अभिलेख, विज वितरण, बँक, उप जिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी विभाग, महिला व बालविकास, वन विभाग, उमेद, यांचे स्टॉल उपलब्ध राहणार आहेत.
शिबीरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायदया अंतर्गत विविध दाखले, प्रमाणपाचे वाटप, अकृषक तरतुदीसंबधी सुधारणाबाबत मार्गदर्शन करणे, क.जा.प., खातेफोड, लक्ष्मी मुक्ती योजना, अतीक्रमीत पांदण / शेतरस्ते मोकळे करणे, अॅग्रीस्टॅक, पी.एम. किसान, आधार कार्ड, आरोग्य तपासणी, जॉब कार्ड, आभा कार्ड, संगायो, श्रावण बाळ, राशन कार्ड, जिवंत 7/12, डीजीटल 7/12 अभिलेख, तुकडे बंदी शासन निर्णय वाचन, एका दिवसात देऊ शकणारे सर्व विभागाचे लाभ, ईत्यादी लाभ संबधीत नागरीकांना शिबीराचे दिवसी देण्यात येणार आहेत.
तरी सर्व नागरीकांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचा लाभ घेण्यात यावा असे आव्हान हरीदास दोनाडकर, तहसिलदार, आरमोरी यांनी केले आहे.



