रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी होळीच्या पावन पर्वावर चिमूर येथे धुलीवंदनाच्या निमित्ताने एक अविस्मरणीय स्नेहमिलन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या दरम्यान वाटर टँकच्या धारांनी भिजलेले वातावरण,रंगबेरंगी गुलाल आणि उत्साहाच्या लाटांनी संपूर्ण परिसर आनंदाने न्हाऊन निघाला.धुलीवंदनाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांसाठी नाश्त्याचेही आयोजन करण्यात आले होते,ज्यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने स्नेहाचा उत्सव ठरला होता.हा स्नेहमिलनचा सोहळा चिमूरकर करिता अविस्मरणीय क्षण होता.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थितांसोबत रंगांचा आनंद घेतला.सुप्रसिद्ध कलाकार अकिंता मोरे यांच्या उपस्थितीने सोहळ्याला एक वेगळीच रोमांचक झळाळी प्राप्त झाली.
विधानसभा क्षेत्रातील नेतेमंडळी तथा शहरातील व ग्रामीण भागातील पदाधिकारी,गावकरी,कार्यकर्ते आणि नागरिक एकाच रंगात रंगून गेले हेच या सोहळ्याचे खरे यश आहे.बंटीभाऊंचा हा उपक्रम म्हणजे जात,भेद आणि अंतर विसरून एकत्र येण्याचा,एकमेकांशी जोडण्याचा एक सुंदर संदेश आहे.
या कार्यक्रमास आमदार किर्तीकुमार भांगडिया समेत माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिशभाऊ वारजुकर,भाजपा राज्य परिषद सदस्य राजु देवतळे संचालक महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संस्था मर्यादित पुणे,उपविभागीय पोलीस अधिकारी ठोसरे,पोलीस निरिक्षक दिनेश लबडे,चिमुर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.गिताताई लिंगायत,नगरपरिषदेचे उपाध्यक्ष संजय नवघडे,भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गुळधे,मंडळ अध्यक्ष मनिष तुमपल्लीवार,कमल असावा,निलम राचलवार,दिपक यावले,भिमराव ठावरी,नगर सेवक सचिन फरकाडे,समिर राचलवार,हरीश पिसे,बंटी वनकर,आदी भारतीय जनता पक्षाचे नेतेमंडळी,सभापती,नगरसेवक,पदाधिकारी तसेच शहर व ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने उत्साही नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी आमदार महोदयांची सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करित धुलीवंदनाच्या सोहळ्याचा आनंद घेतला!



