Home देशविदेश भारीपाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा.रणजीत मेश्राम पडद्याआड… — त्यांच्या निधनाने योग्य आंबेडकरी...

भारीपाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा.रणजीत मेश्राम पडद्याआड… — त्यांच्या निधनाने योग्य आंबेडकरी विचारवंत हरपला….

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

      फुले-आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत,ज्येष्ठ पत्रकार आणि भारिप बहुजन महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा.रणजित मेश्राम यांचे निधन झाले असून सामाजिक व राजकीय स्तरावरून शोक व्यक्त केला जात आहे.

       प्रा.रणजित मेश्राम यांनी भारिप बहुजन महासंघाची भूमिका,व्यापक स्वरूपात विकसित करण्यास महत्त्वाचे योगदान दिले होते. 

       तसेच राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष असतांना त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.फुले- आंबेडकरी चळवळ व्यापक स्वरूपात करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. 

      वंचित बहुजन आघाडी आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंबियांच्यावतीने प्रा.रणजित मेश्राम यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली जात आहे.

        प्रा.रणजीत मेश्राम हे उत्तम वक्ते असल्याने त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी बरीच गर्दी असायची…

        आंबेडकरी चळवळीला आयुष्यभर दिशा देणारे, समाजातील वंचित-शोषितांसाठी सतत लढणारे ज्येष्ठ नेते रणजित दादा मेश्राम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने चळवळीतील एक विचारवंत आणि संघर्षशील आवाज हरपला आहे. समाजप्रबोधन,लेखन आणि सामाजिक बांधिलकी यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.