जाकीर सैय्यद
उपसंपादक
एपस्टीन फाईल प्रकरणाने संपूर्ण जगभर हाहाकार माजला असताना देशातील विरोधी पक्ष व इतर राजकीय पक्ष मूग गिळून गप्प बसलेले आहे.
भारताचे प्रमुख बडे राजकारणी आणि त्यांचे अनेक सहकारी मंत्री व बडे उद्योगपती यांची नावे या प्रकरणांमध्ये जाहीर झाली असून या संबंधाने जाब विचारण्याचे धाडस कोणी करताना दिसत नाही.
अशा अवस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडीने एफस्टिन फाईल प्रकरणाचा तडा लावण्यासाठी जाहीर एल्गार पुकारलेला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी 2 मार्चला मुंबई येथे एप्सटीन फाईल प्रकरणी जाहीर एल्गार पुकारला असून विरोधी पक्षाने मौन पाळल्याबद्दल जाब विचारला आहे.
वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण भारतीयांना या गंभीर प्रश्नाबाबत अवगत केले असून वंचित बहुजन आघाडीच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीने जाहीर निषेध नोंदवला असून संपूर्ण कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून याचा निषेध नोंदवलेला आहे.
याप्रसंगी डॉ.नीरज वाघमारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,उपाध्यक्ष- विशाल पोले,जिल्हा महासचिव- एड.संजय इंगळे,जिल्हा महासचिव-अशोककुमार कयापाक साहेब,शैलेश भानवे,आनंद भगत,उपाध्यक्ष -विशाल पोले,प्रमोद पाटील शहर कार्याध्यक्ष,गजानन कोकाटे,यादवराव नगराळे,दीपक वीर,थावरुजी वैद्य,भीमराव शिरसाट,संतोष मसराम,नितेश पाटील,सचिन मोहोड,चंद्रकांत वाळके,उत्तम कांबळे,अरविंद दिवे,दीपक वीर,केशव भागवत,रामदास वीर,मीराताई वीर,करुणा मून,संध्या काळे,भारतीताई सावते,सविता तिडके,सुजाता नगराळे,मालाताई पाटील,अंतरा अंबादे,लता भरणे,ईंदू सांगळे,विशाखा नगराळे,पूनम अंबादे सुशीला गजभिये,विजया लोखंडे,माया मस्के,रेखा गजभिये,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.



