ऋग्वेद येवले
उपसंपादक
साकोली खास बैलांच्या भव्य इनामी जंगी शंकरपटानिमित्त दि.६ मार्च २०२६ रोजी एकोडी रामनगर येथील संत गाडगे बाबा समाज मंदिर बाजार चौक च्या भव्य आवारात नवनिकेतन नाट्य कला संच यांच्या सौजण्याने मोफत राष्ट्रीय संगित दुय्यम खडा तमाशा अनेक वर्षानंतर पहिल्यांदा आयोजित करण्यात आला आहे. शाहीर सुरज नवघरे यांचा क्रांतीज्योती कलगी मंडळ खंडाळ निलज व संच तसेच शाहीरा सुरमा बारसागडे राष्ट्रीय कलापथक निलज व संच यांच्या दरम्यान हा दुय्यम मुकाबला पार पडेल.
तमाशाचे उदघाटन समाजकल्याण सभापती शितल राऊत यांच्या हस्ते आ.नाना पटोले यांचे स्विय एच.बी.भेंडारकर यांच्या उपस्थितीत सरकारी अधिव्याख्याता अॅड. सुरेश रामटेके याच्या अध्यक्षतेखाली पार पडेल.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता धम्मशिल नंदेश्वर, पंचायत राज अभियान प्राचार्य अभय बन्सोड, माजी जि.प.सदस्या माहेश्वरी नेवारे, डाॅ.नेपाल रंगारी, परमानंद मेश्राम, सरपंच संजय खोब्रागडे एकोडी, नंदकिशोर समरीत पिंडकेपार, हरिश्चंद्र दोनोडे परसटोला, नगराध्यक्ष देवेश्री कापगते, नगरसेवक संदिप बावनकुळे, सभापती डॉ. ललित हेमने, प्रकाशराणा मेश्राम, आर. एस. डोंगरवार, मंदार खेडीकर, शिलकुमार वैद्य, राजेश सूर्यवंशी, रमेश खेडीकर, उपसरपंच रिगन राऊत सर्व ग्रा.पं.सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित असतील.
तमाशाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष कैलाश जांभूळकर, उपाध्यक्ष कार्तीक मेश्राम, सचिव सुखराम जांभुळकर, सहसचिव टिकाराम द्रुगकर, किशोर राऊत, कोषाध्यक्ष जयलाल नामुर्ते. गुरुचरण नेवाने, सुभाष चचाने, नामदेव सोनटक्के, भावेश कोटांगले, तिर्धानंद बोरकर ,सुकराम बन्सोड, फिरोज कोटांगले, राधेश्याम नेवारे व संपूर्ण कार्यकारिणीने केले आहे.



