Home Social शिरपूर(देउळगाव) येथे जेष्ठ नाट्य कलावंत भूमाला ताई कुंभरे (उईके) यांचा सत्कार…

शिरपूर(देउळगाव) येथे जेष्ठ नाट्य कलावंत भूमाला ताई कुंभरे (उईके) यांचा सत्कार…

ऋग्वेद येवले 

   उपसंपादक 

           संमिश्र नाट्य मंडळ शिरपूर (देऊळगाव) ता कुरखेडा जी गडचिरोली येथे सुवर्ण तुला या नाट्य प्रसंगी महिला मंडळाच्या वतीने जेष्ठ नाट्य कलावंत तथा माजी जिल्हा परिषद सदस्या यांचा साळी चोळी, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

            सत्कार करण्याचा उद्देश की स्वतः भूमाला ताई यांचा नाट्य प्रवास शिरपूर येथून सुरवात झाली त्यांचे गुरू हार्मोनियम वादक अब्दुल करीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाटकात प्रवेश केला ती आठवण तेथील महिला मंडळ यांना होती. म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.

          त्यावेळी उदघाटक म्हणून महोम्मद ईनुष शेख नगरसेवक,नवनाथ धाबेकर कुरखेळा यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार करण्यात आला.