Home Social विर्शी येथे भव्य विदर्भस्तरीय लोककला महोत्सव १० व ११ मार्च रोजी… ...

विर्शी येथे भव्य विदर्भस्तरीय लोककला महोत्सव १० व ११ मार्च रोजी… — जनजागर कला साहित्य संस्थेचा उपक्रम… — कवी संमेलन, नाटक व लोककलांचे सादरीकरण…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

         साकोली जनजागर कला साहित्य बहुउद्देशिय संस्था साकोलीच्या वतीने स्मृतीशेष प्रबोधनकार मनोज कोटांगले यांच्या प्रेरणेतून साकोली तालुक्यातील विर्शी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दि.१० व ११ मार्च २०२६ असा दोन दिवशीय भव्य विदर्भस्तरीय लोककला महोत्सवाचे आयजन करण्यात आले आहे.

          यात लावणी, गोंधळ, खडी गंमत, गोंडी गीत, जागरण, कीर्तन, कव्वाली, आर्केस्ट्रा, रील्स, नाट्यसंगीत, एकपात्री अभिनय, कलापथक, जादूचे प्रयोग, दंडार, भजन तसेच राज्यस्तरीय कवी संमेलन व नियोजित तथा उपस्थित कलावंतांची लोककला सादरीकरण केले जाईल.

       दि.१० मार्च रोजी आ.नाना पटोले यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन पार पडेल. संमेलनाध्यक्ष म्हणून समाज कल्याण विभाग चंद्रपूरचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, स्वागताध्यक्ष म्हणून डाॅ. सोमदत्त करंजेकर, विशेष अतिथी म्हणून समाजकल्याण सभापती शितल राऊत, नगराध्यक्ष देवश्री कापगते, विशेष आकर्षण म्हणून पद्मश्री डाॅ.परशुराम खुणे, अभिनेता अनिरूद्ध बनकर, अ.भा.मराठी रंगभूमीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, सरपंच लिलाधर सोनवाने, शेखर पटले, तहसिलदार निलेश कदम, पो.नि.महादेव आचरेकर, सभापती ललित हेमणे, सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, पं.स.सदस्य अर्चना इळपाते, सभापती चेतन वडगाये, संस्थेचे अध्यक्ष भावेश कोटांगले, उपाध्यक्ष उमेश भोयर, सचिव धनंजय धकाते, उपसरपंच नंदलाल राऊत, सुभाष कोठारे, परमानंद गहाणे, नरेश देशमुख, उमाजी बिसेन, कमलेश पाटील. भूमाला कुंभरे, जयंत देशपांडे, पो.पा.नंदलाल गहाणे, तं.मु.स.अध्यक्ष रंजित बांगळकर, मुख्या.कामठे, बोरकर व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहतील. विविध कलावंत आपल्या कलांचे सादरीकरण करतील. यावेळी  आशावरी तिडके, सपना मोटघरे, दुधराम कावळे, विनोद मुरकुटे, राजकुमार देशभ्रतार, राजू सोरले, तीर्थानंद बोरकर, मनोज बोपचे, कार्तिक मेश्राम, प्रभू भुरे आदी कलावंतांचा सत्कार केला जाईल.

         राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष म्हणून उज्वल व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका उषा घोडेस्वार तर उदघाटन निळं पाखरूचे लेखक सुभाष मानवटकर यांच्या हस्ते पार पडेल.

        दुसर्‍या दिवशी उर्वरित लोककलावंत आपल्या कला सादर करतील. सायंकाळी समारोपिय कार्यक्रमाप्रसंगी माजी क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोल्हे, जि.प.सदस्या दीपलता समरीत, पं.स.सदस्य सुशील गणवीह, सुरेंद्र उके, , प्रविण भांडारकर, सर्व विर्शी ग्रा.पं.सदस्य आदी मान्यवर उपस्थित राहतील. 

           रात्री ९ वाजता शेखर पटले दिग्दर्शित सजणा मी डाव जिंकला या नाटकाचे सादरीकरण होईल.

          तरी सदर लोककला महोत्सवाला कलाप्रेमींनी जास्तीत संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनजागर कला साहित्य बहुऊद्देशिय संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.