शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मौजा विहिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक ०१ मधील मुख्य चौकात हायमस्ट स्ट्रिट लाईट बंद अवस्थेत असून सदर लाईट सुरु करण्याची मागणी सचिव (ग्रामसेवक) ग्रामपंचायत विहिरगाव यांच्याकडे भिम वाॅरियर्स गृपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सदर स्ट्रिट लाईट क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिकृती पुतळ्याच्या पुढे आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ येत असल्याने स्ट्रिट लाईट सुरु होणे आवश्यक असल्याचे मत भिम वाॅरियर्स गृपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हायमस्ट स्ट्रिट लाईट बऱ्याच दिवसांपासून बंद असून सदर लाईट जवळील परिसर काळोखात आहे…
निवेदन देताना उत्तम मेश्राम,सुशिल मेश्राम,प्रज्वल मेश्राम,रोशन पाटील,अभिषेक जिवतोडे,यश ठवरे,वतन गोंडाने,विश्वास रामटेके,समीर रामटेके,रतन गोंडाने आणि इतर भिम वाॅरियर्स गृपचे पदाधिकारी उपस्थित होते.



