प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भारत सरकार व राज्य सरकारे,यांच्या छत्रछायेखाली मनुवादी धर्म परंपरेनुसार भारत देशात पुन्हा जातीयवाद जोमाने फोफावत आहे आणि या जातीयवादाला अनुसरून बहुजन समाजातील नागरिकांचे शोषण करणारी व्यवस्था घट्ट होत आहे.एवढेच कायतर जातीयवादाला अनुसरून नियोजनबध्द पध्दतीने त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करणे सुरू केले आहे.
मनुवादी (ब्राम्हण) विचारधारेनुसार,”भारत सरकार व राज्य सरकार यांची कार्यपद्धत सुरू असल्याने,हिच कार्यपद्धत बहुजन समाजासाठी मारक ठरत आहे.यामुळे बहुजन समाजाचे शोषण करणारी व्यवस्थाच शासन-प्रशासनातंर्गत सक्रिय करण्यात आली असून मुनुवादी विचारसरणीचे लोक,सत्तेच्याआड दिवसागणिक बहुजन समाजावर अन्याय करीत आहेत,अत्याचार करीत आहेत.
बहुजन समाजाच्या (एससी,एसटी,ओबीसी व अल्पसंख्याक) शोषणात ऐतिहासिक जातीयता-सरंजामशाही आणि आर्थिक असमानता महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
भारतात जाती आधारित भेदभाव,शैक्षणिक व आर्थिक संसाधनांची असमान विभागणी आणि ग्रामीण भागात भूमिहीनता यांसारख्या सामाजिक व आर्थिक रचना शोषणाला कारणीभूत ठरत आहेत.
याविरोधात संवैधानिक हक्क मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक चळवळी व संस्था कार्यरत आहेत,पण शासन-प्रशासनाची बेबंदशाही एवढी सिगेला पोहोचली आहे की,ते भारत देशांतर्गत बहुजन महिला,पुरुष,विध्यार्थी,बेरोजगार,शेतकरी,वंचित,पिडितांसाठी, समानता अतंर्गत, “संविधानानुसार, काम व कर्तव्य पार न पाडता,मनमुजोरी नुसार पार पाडीत आहेत.
बहुजन समाजाच्या शोषणाचे मुख्य पैलू म्हणजे सत्तेच्या व प्रशासनाच्या आड,जातीयवादी मानसिकता जोपासने होय आणि बहुजन समाजाची समप्रमाणात उन्नती न करण्याचा ऐतिहासिक सामाजिक बहिष्कार होय.भारतामध्ये जातीय पूर्वग्रह आणि जातीयता हे बहुजन समाजातील लोकांच्या सामाजिक व आर्थिक शोषणाचे मुख्य कारण आहे.
आर्थिक शोषण व गरिबी याला कारण म्हणजे बहुजन समाज हा मुख्यतः भूमिहीन किंवा अल्पभूधारक असल्याने आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहापासून तो वंचित ठेवण्यात आला आहे.जे शोषणाचे मुख्य कारण आहे.
तद्वतच राजकीय व सामाजिक बहिष्कृतता: म्हणजे जातीय संरचनेमुळे बहुजन समाजाला आणि बहुजन समाजातील मंत्री,खासदार,आमदार यांना निर्णय प्रक्रियेतून आजही बाहेर ठेवले जात आहे.
शोषण आणि अन्याय….
शोषणाविरुद्ध लढा देणाऱ्या काही संस्था/सामाजिक संघटना/राजकीय पक्ष भारत देशात कार्यरत आहेत..
*****
मान्यवर कांशीराम आणि बसपा…..
बहुजन समाज पार्टी (BSP) हा एक प्रमुख राजकीय पक्ष असून दलित,आदिवासी इतर मागासवर्गीय (OBC) आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करत आहे.
बसपाचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीराम यांनी अख्खा भारत देशात बहुजन समाजातील लोकांच्या हितासाठी,संरक्षणासाठी, प्रगतीसाठी अनेक पध्दतीची जनआंदोलन केलीत,मोठमोठ्या सभा व कार्नर सभा घेतल्यात.
त्यांचे लोकहितांचे विचार,स्लोगन बहुजन समाजातील लोकांच्या मनामनात बसली आहेत.ते एक लोकप्रिय नेते ठरलेत.
आता बहुजन समाज पार्टीची धुरा बहन मायावती यांच्याकडे आहे.त्यांचे पक्ष पदाधिकारी भारत देशातील कानाकोपऱ्यात आहेत.तेही बहुजन समाजावरील अन्याय व अत्याचाराला रोखण्यासाठी विविध प्रकारे कार्य करीत आहेत.
*****
वामन मेश्राम आणि भारत मुक्ती मोर्चा-बामसेफ…
याचबरोबर,”भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम,त्यांचे अनेक पदाधिकारी सहकारी,कार्यकर्ता सहकारी,हे भारत देशातंर्गत बहुजन समाजातील लोकांना (भारतातील मुळ निवासी लोकांना) वेगाने जागरुक करीत आहेत आणि या लोकांच्या अधिकारांसाठी सातत्याने कार्यक्रम,अधिवेशन घेत आहेत,जनआंदोलन करीत आहे.
तत्त्ववेत्ता वामन मेश्राम यांनी तर,भारत देशातील ब्राम्हण शोषणकर्त्यांवर व त्यांच्या बहुजन समाज विरोधी चालीरितीवर,कार्यपध्दतीवर सरळसरळ वैचारिक वार करणे सुरू केले असल्याने,आपले खरे दुश्मन कोण आहेत हे भारत देशातील बहुसंख्य बहुजन लोकांना कळू लागले आहे आणि त्यांच्यात असलेल्या अयोग्य कार्यपद्धतेतील राजकीय,सामाजिक,परंपरेची भिती दूर होवू लागली आहे.
यामुळे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे लोकमान्य नेते म्हणून राष्ट्रीय स्तरावर मान्य झाले आहेत.त्यांच्या स्पष्ट विचारांमुळे ब्राम्हणांचे आणि ब्राम्हणवादी विचारधारेचे जुल्मी पितळ उघडे पडत आहे….
ते बहुजन समाजातील लोकांचे म्हणजेच भारत देशातील मुळ निवासी लोकांचे संघटन देश पातळीवर मजबूत करण्यासाठी यशस्वी होताना दिसत आहेत.एरवी ते भारत देशातील ब्राम्हणवादी सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
*****
अँड.प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी….
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे कुणालाही न घाबरता,बहुजन समाजातील लोकांच्या हितासाठी,संरक्षणासाठी,प्रगतीसाठी रात्रंदिवस संघर्ष करीत आहेत.
बहुजन समाजातील लोकांना जागरूक करण्याचे काम अँड.प्रकाश आंबेडकर,युवा नेते सुजात आंबेडकर करीत असून चुकीचे काम करणाऱ्यांना उघडे करीत आहेत.
याचबरोबर त्यांच्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे अँड.प्रकाश आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून अन्याय अत्याचारांच्या विरोधात पोटतिडकीने लढत आहेत.बहुजन समाजाला जागरुक करीत आहेत.
त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र राज्यासह भारत देशातील जनता भयमुक्त होत असल्याने,जनता स्वत:ला सुरक्षित समजत आहे…
*****
खासदार चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे पक्ष पदाधिकारी…..
खासदार चंद्रशेखर आझाद हे तरुण असून त्यांनी आपल्या पक्षाची पाळेमुळे अख्या भारत देशात पसरविण्याचे काम सुरू केले आहे.
याचबरोबर अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आवाज म्हणून ते लोकप्रिय ठरु लागले आहेत,त्यांच्या पक्षाची दिशा हे अन्यायाचा व अत्याचारांचा तात्काळ प्रतिकार करणारी असल्याने त्यांच्याकडे भारत देशातील लोकांचे वलय आहे….
त्यांची कार्यपद्धत सत्ताधाऱ्यांना सडोकीपडो करुन सोडणारी असल्याने शासन-प्रशाशन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे.मात्र ते उमदा नेते म्हणून लोकांच्या नजरेत आले आहेत.
*****
दिपक केदार आणि दलित पँथर…
दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी अनुसूचित जाती-जमातीच्या आणि विमुक्त भटक्या जमातीच्या लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांच्या विरोधात अनेकदा संघर्ष केला आहे आणि करीत आहेत.
त्यांनी महाराष्ट्र राज्यातील शासन-प्रशासनला घाम फोडला आहे.
*****
अनेक तत्त्ववेत्ता…
महात्मा ज्योतिबा फुले,राजश्री छत्रपती शाहू महाराज,युगप्रवर्तक विश्वरत्न डॉ.आंबेडकर,लोक उध्दारक संतमहापुरुष यांच्या विचारधारेला मानणारे अनेक तत्त्ववेत्ता हे बहुजन समाजावरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी नेहमी संघर्ष करीत आहेत.
परंतु ज्या बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी,हितासाठी,संरक्षणासाठी,हक्कासाठी बहुजन पक्ष,बहुजन सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसरात्र काम-कार्य करतात,तानांच बहुजन समाजातील लोक सहकार्य करत नाही.ही त्यांच्या विचारांची अपरिपक्वता आहे असे दिसून आले आहे.
मात्र उलटपक्षी,जातीयवादाला,अन्यायाला,शोषणाला,खतपाणी घालणाऱ्या राजकीय पक्षांना,सामाजिक संघटनांना ते समर्थ देत असल्याचे आढळून आले आहे.
यामुळे १५ टक्के उच्चवर्णीय लोक,हे बहुजन समाजातील लोकांच्याच सहकार्याने,बहुजन समाजातील बहुसंख्य लोकांवरच सहज अन्याय करतात,त्यांचे शोषण करतात,त्यांचे अधिकार नाकारतात अशी गंभीर परिस्थिती आहे.
*****
निरर्थक ठरु लागले….
शासन स्तरावरुन बहुजन समाज प्रेरणा केंद्र हे भारतातील दलित चळवळीतील कामगिरीचे स्मरण आणि उत्सव साजरा करण्यासाठी,तसेच सामाजिक जागृतीसाठी स्थापन करण्यात आले आहेत.पण त्यांनी अजून पर्यंत प्रभावी व परिणामकारक कार्य केलेले दिसून येत नाही..
तद्वतच शिक्षण,रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी काम करणाऱ्या संस्था जसे की महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) मागासवर्गीयांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करतात.
पण,या संस्था सरकारच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या असल्याने,”त्यांचा बोलवता धनी व काम करवून घेणारा धनी, सरकार असते.
बहुजन समाजाचे शोषण हे प्रामुख्याने जातीय आणि आर्थिक विषमतेमुळे होत आहे.बहुजन समाजाचे शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात इतर मागास बहुजन कल्याण विभागमहाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) आणि विविध ओबीसी महामंडळे कार्यरत आहेत.या संस्था शैक्षणिक-आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कर्ज प्रशिक्षण व शिष्यवृत्ती योजना राबवतात.
याचबरोबर इतर मागास बहुजन कल्याण विभाग (OBC Bahujan Kalyan Department): ओबीसीव्हीजेएनटी (VJNT)आणि एसबीसी (SBC) वर्गाच्या कल्याणासाठी कार्यरत सरकारी विभाग आहेत.
तद्वतच ओबीसी,व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासस्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि संशोधन करणारी संस्था कार्यरत आहेत.
परंतु बहुजन समाजातील (दलितआदिवासीओबीसी आणि अल्पसंख्याक) लोकांवर होणारा अन्याय हा सामाजिक – आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचा आहे.देशात बहुसंख्य सुमारे ८५% असूनही या घटकांवर उच्चवर्णीय मानसिकतेतून होणारे अत्याचार सहन करण्याच्या पलिकडचे आहेत. याचबरोबर शिक्षण-नोकरीतील संधींपासून सामाजिक भेदभाव सहन करत आहेत.
अजून अन्याय सहन किती वर्ष करायचा…..
रोहित वेमुला प्रकरण किंवा उना घटनेसारखे अत्याचार,जातीय भेदभाव आणि दंगलींमध्ये बहुजन समाजाला लक्ष्य करणे,यासारख्या घटना आजही घडतात.
शिक्षणाचे खाजगीकरण आणि व्यावसायिकीकरणामुळे बहुजन विद्यार्थी महत्त्वपूर्ण शिक्षणापासून वंचित राहत आहेत,तर सरकारी संस्थांमध्येही बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही,हे लक्षात येते आहे.
सत्ताधारी पक्ष,बहुजन समाजाला जात आणि धर्मात अडकवून ठेवत आहेत,तर प्रस्थापित सत्ता १५-२०% लोकांच्या हातात असल्याने,बहुजन समाजातील मूळ प्रश्नांची,मुळ समस्यांची,ते दखल घेत नाही हे वास्तव आहे.
अनेकदा आरक्षणाच्या हक्कांवर गदा आणली जाते आणि आरक्षणाचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचण्यात मर्यादा येतात असेही दिसून आले आहे.
मायावतींसारख्या नेत्यांनी सतत काँग्रेस-भाजप आणि समाजवादी पक्षावर बहुजन विरोधी धोरणांचा आरोप केला आहे.तसेच बहुजनांनी आपल्या शोषकांना ओळखून जागृत राहणे गरजेचे असल्याचे मत वारंवार व्यक्त केले जाते.
भारत देशातंर्गत बहुजन समाजाला धर्मांधता,जातीयवादाच्या चक्रव्युव्हात अडकवून,सत्ताधारी त्यांचे वारंवार शोषण करतात,त्यांच्यावर न्यायाच्या परिभाषातंर्गत अन्याय करतात,अत्याचार करतात,त्यांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवतात,त्यांना मानसिक व वैचारिक गुलाम करुन ठेवतात,त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात येऊ देत नाही.
यामुळे हजारो वर्षांपासून बहुजनांचे शोषण आणि त्यांच्यावर होणारे अन्याय सातत्याने सुरुच आहेत,हे खेदाने म्हणावे लागते आहे.


