ऋषी सहारे
संपादक
जोगीसाखरा – वडसा वन विभाग, वडसा वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी क्षेत्र सहाय्यक पळसगाव यांच्या अंतर्गत आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे चौकात मानव व वन्यजीव संघर्ष व वनवा टाळण्यासाठी मनोरमा बहउद्देशीय विकास संस्था गडचिरोली पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली यात जंगलात वनवा लागू न देणे ही सामाजिक जबाबदारी आहे.
आपला शेतीचा बांध जाळताना प्रथम आपल्या नजीकच्या वन अधिकायांना सांगा, वनात फिरायला जाताना अग्नीजन्य वस्तू घेवून जावू नये. जंगलात किंवा जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने सिगारेट, बिडी ओडूनये.कोणत्याही कारणाने आग लावण्याचा प्रयत्न करू नये.जंगलात गवत किंवा झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात. त्यामुळे विहीर, बोअरवेल यांना पाणी वाढते.गवतांमुळे डोंगराची माती वाहून जात नाही. त्यामुळे उन्हाची तिव्रता कमी होण्यास मदत होते.
पशु पक्षी यांना निवारा मिळाल्याने निसर्ग चक्र सुधारते. रानात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या चालू असलेल्या मानव वन्यप्राणी संघर्ष या सारख्या समस्यांना प्रतिबंध होईल. असे पथनाट्यातुन प्रबोधन करण्यात आले हे पटनाट्य पळसगाव उपवन क्षेत्र सहाय्यक देविदास बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम पत्रकार भिमराव मेत्राम हरीदास बावणे सोपानदेव गेडाम पळसगाव वनरक्षक नारायण शिऊरकर , जोगीसाखरा वनरक्षक नवनवीन सागोळकर , सावलखेडा वनरक्षक हेमंत लोनबले, मजेवाडा वनरक्षक रुपा सहारे , सालमारा वनरक्षक विरागना शेंडे या सह जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी , गावकरी उपस्थित होते.



