Home Social कूरखेडा येथे हिंदू सम्मेलना निमीत्त निघाली वाजत गाजत विशाल शोभायात्रा…

कूरखेडा येथे हिंदू सम्मेलना निमीत्त निघाली वाजत गाजत विशाल शोभायात्रा…

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी

सकल हिंदू समाज कूरखेडा यांच्या वतीने रविवारी सांयकाळी श्रीराम मंदिर कूरखेडा येथे हिंदू सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी हनूमान मंदिर कूरखेडा येथून पारंपरिक वाद्य यंत्रासह वाजत गाजत तसेच अश्वारूढ़ शिवाजी महाराजांचा वेशभूषेतील कलांवंत व भगव्या पताका घेत जय श्रीराम चा जय घोष करीत दूपारी ३ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली. 

       शोभायात्रा हनुमान मंदिर कूरखेडा येथून सूरवात होत गांधी चौक, कूंभीटोला रोड, राणा प्रताप वार्ड,मस्जीद चौक, आंबेडकर वार्ड ते मार्केट रोड मार्गे श्रीराम मंदिर कार्यक्रम स्थळी पोहचली येथे ध्वजारोहण,गोमाता पूजन, भारतमाता आरती, भजन व महाप्रसाद तसेच विनोद बिहारी गोस्वामी महाराज व विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ संघटन मंत्री विष्णूजी देशमुख यांचे मार्गदर्शन झाले.

          शोभायात्रेत माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपा तालूका अध्यक्ष चांगदेव फाये,कांग्रेस तालूका अध्यक्ष जिवन पाटील नाट,भागवतचार्य अविनाश दुबे महाराज,मिश्रा महाराज, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, नगरपंचायत सभापती सागर निरंकारी, नगरसेवक एड उमेश वालदे, भाजयूमोचे उल्हास देशमुख,मंगेश मांडवे,राहूल गिरडकर,लक्ष्मन धूळसे,देवानंद गिरडकर, देवेंद्र फाये, गितेश्वर ऊईके,दिलीप सोरते, कोंडावार जी, यांचा सह मोठ्या संख्येत हिंदू बांधव सहभागी झाले होते.