राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
नान्ही ते तळेगांव मार्गावर गोपनीय माहीती वरून सापळा रचत कूरखेडा पोलीसांनी एका आरोपीला अवैधपणे दूचाकीने देशी दारूची वाहतूक करीत पकडले व त्याचा विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गून्हा दाखल केला.
होळी सणानिमीत्त तालूक्यात अवैध दारूची तस्करी वाढलेली आहे, पोलीसानी सूद्धा अवैध विक्रेता विरोधात मोहिम तिव्र करीत मिळालेल्या गोपनीय माहीती वरून आज पहाटे नान्ही – तळेगाव मार्गावर सापळा रचत संशयावरून या मार्गावरून येणाऱ्या एम एच ४९ बि सी ५३७८ या वाहनाला थांबवत तपासणी केली यावेळी वाहनात ४ पेटी अवैध देशी दारू किमंत २८ हजार रुपए व २५ हजार किमतीचे वाहन असा ५३ हजाराचा मूद्देमाल आढळून आला आरोपी वाहन चालक आकाश कोरेटी वय २८ रा.नान्ही ता कूरखेडा याचा विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गून्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांचा मार्गदर्शनात ठाणेदार महेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदिपकूमार ताराम,पो. ह. शेखलाल मडावी ,पो. शि. संदेश भैसारे,नरसिंग कोरे,राकेश येळणे यांचा चमूने केली.



