रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मराठी भाषेच्या संवर्धन व जतनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आली.यावेळी कार्यकारी प्राचार्य डॉ.प्रफुल्ल बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संप्पन झाला.त्यानी आपल्या मार्गदर्शनात मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन मराठी भाषेचे जतन व संवर्धन केले पाहीजे असे सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय शाळा चिमूर येथील सहाय्यक शिक्षीका डॉ.अश्वीनी रोकडे म्हणून होत्या.त्यानी आपल्या मार्गदर्शनात मराठी भाषा उदय- विकास यावर सविस्तर भाष्य केले.मराठी भाषा ही आपली ओळख संस्कृती व परंपरा आहे.मराठी भाषेचे अस्तिव जोपासणे काळाची गरज आहे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रा.डॉ.पितांबर पिसे,प्रा.डॉ. नितिन कत्रोजवार,प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रा.डॉ.राजेश्वर राहांगडाले,डॉ.आशुतोष पोपटे,प्रा.राकेश कुमरे,प्रा.गुणवंत वाघमारे,प्रा.रिना भोयर,प्रा.गजानन चव्हान,प्रा. दुर्योधन रोकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोशन कुमरे यांनी केले.प्रास्ताविकातून मराठी विभाग प्रमुख डॉ.कार्तिक पाटील यांनी मराठी भाषेचा प्रवास व सर्वसमावेशकता विशद केली.
आभार प्रा.वर्षा सोनटक्के यांनी केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्व,इतिहास व आधुनिक काळातील उपयोग यावर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.



