Home देशविदेश मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

मुंबई : एपस्टीन फाईल प्रकरण,अमेरिकेशी एकतर्फी व्यापार प्रकरण,पंतप्रधान मोदी यांचा एपस्टिन फाइल्समध्ये उल्लेख यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात २ मार्च २०२६ रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात नियोजित असलेल्या ‘एपस्टिन फाईल्स’ संदर्भातील आंदोलनावरून दादर रेल्वे स्थानक परिसरात मोठा वाद पाहायला मिळाला.वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पत्रक वाटप करत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र मुंबईकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पोलिसांना अखेर माघार घ्यावी लागली.

नेमकी घटना काय?…

      CSMT येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते शनिवारी (दि.२८) सकाळी मुंबईमध्ये दादर स्थानकाबाहेर पत्रके वाटत होते. 

        यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीपेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळाले.कार्यकर्त्यांना पोलिसांकडून होताना दिसणारा त्रास पाहून आजूबाजूचे सामान्य मुंबईकर स्वतःहून पुढे आले आणि पोलिसांना भिडले.परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आणि सर्वसामान्यांचा संताप पाहून पोलिसांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. 

       हे केवळ एका पक्षाचे आंदोलन राहिलेले नाही,तर हे जनतेचे आंदोलन बनले आहे. हे जनरेट्याचे वादळ आता कोणीही रोखू शकत नाही.दडपशाही करून आवाज दाबता येणार नाही,अशी प्रतिक्रिया वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

        पोलिसांच्या या कारवाईनंतर वंचित बहुजन आघाडी आपल्या भूमिकेवर अधिक ठाम झाली आहे.आंदोलन तर होणारच असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून,२ मार्च रोजी होणाऱ्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर हे सामील असणारा आहेत. यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे नरेंद्र मोदी विरोधात महाआंदोलन होणार आहे.