ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.युवराज बोंधे आणि प्रा.समीर भेलावे उपस्थित होते.
“विज्ञानातील महिला – विकसित भारताचे उत्प्रेरक ” या थीमला अनुसरून कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाने केले होते. या दिवसाचे औचित्य साधून “सायन्स एप्टिट्यूड टेस्ट” चे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला व १४० विद्यार्थ्यानी ही परीक्षा दिली.
वरिष्ठ महाविद्यालय गटातून, कु. विशाखा मधुकर नन्नावरे हिने प्रथम तर कु. समीक्षा मेश्राम हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच कनिष्ठ महाविद्यालय गटातून आयुष प्रभाकर देशकर यांनी प्रथम आणि कु. सायली सुरेश चांभारे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुनंदा आस्वले यांनी विद्यार्थ्यानी वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करून आपण अंधश्रद्धा दूर करू शकतो हे पटवून दिले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. समीर भेलावे यांनी सी.वी.रमण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व डॉ.युवराज बोधे यांनी विज्ञानाचा संबंध हा आध्यात्मिक व पुरातन काळामध्ये कसे होते याबद्दल विद्यार्थ्याना सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.नागेश ढोरे यांनी विकसित भारताच्या उभारणीमध्ये महिला शास्त्रज्ञच्या योगदानावर भर दिले व विद्यार्थ्याना त्यांचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे संचालन कु.साजिया शेख आणि प्रस्तावना डॉ.नागेश ढोरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ.प्रणाली टेंभुर्णे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बिजनकुमार शील, प्रा. रोहित चांदेकर, प्रा. केदार कापसे, श्री कमलेश दडमल व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.



