Home Social हनुमान मंदिर, नर्सरी कॉलनी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन…

हनुमान मंदिर, नर्सरी कॉलनी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : हनुमान मंदिर नर्सरी कॉलनी साकोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योग प्रशिक्षक डॉ. जितेंद्र कुमार ठाकूर म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

       त्यामुळे आपण अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडत आहोत. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी योगाला जीवनाचा भाग बनवले पाहिजे. दररोज किमान एक तास योग करावा. योग हा केवळ व्यायाम नाही तर जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. आरोग्य, संयम आणि आध्यात्मिक शांतीकडे वाटचाल करण्याचे ते एक माध्यम आहे. योग केल्याने सर्वांगीण विकास होतो. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली.

      यानंतर सूक्ष्म व्यायाम, आसने आणि प्राणायाम करण्यात आला. ओमप्रकाश अग्रवाल, मोहन भांडारकर, आशिष भुते, तुलसीदास भाजीपाले, भूमेश पटेल, तेजाराम सार्वे, संजय बडवाईक, कापगतेजी आणि सर्व मान्यवरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.