Home Social वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय मध्ये योग दिन साजरा…

वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय मध्ये योग दिन साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये 21 जून जागतिक योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून योग करून घेण्यात आला.

      योग शिकविण्याकरिता डॉ.जितेंद्र कुमार ठाकूर शारीरिक शिक्षण निर्देशक राजीव गांधी महाविद्यालय सडक अर्जुनी यांना प्रचारण करण्यात आले त्याप्रसंगी योग व्यायामाचे आणि आरोग्याचे प्रभावशाली माध्यम असून शरीरांच्या अवयवांचाच नव्हे तर मन मेंदू आणि आत्म्याचे संतुलन ठेवण्याचे काम योगाच्या माध्यमातून होत असते असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र कुमार ठाकूर यांनी केले.

         त्याचप्रमाणे जगाला मनःशांती आणि व्याधीमुक्त जीवन प्रदान करणारी एकमेव विद्या म्हणजे योग विद्या होय शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम फार आवश्यक असून योगाद्वारे घरीच सर्व व्यायाम करू शकतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांनी केले.

       कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयातील प्राध्यापक श्री नीरज अतकरी यांनी केली योग दिनाच्या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता डॉ.राजश्री मॅम, डॉ.सुनील कापगते, श्री पुखराज लांजेवार, श्री शाहिद सय्यद, श्री अशोक मीना, श्री रवींद्र मुंगुलमारे व श्रीमती रश्मी टिकेकर यांनी मोलाची मदत केली.