Home देशविदेश धर्माच्या पायावर विषमतेची इमारत…

धर्माच्या पायावर विषमतेची इमारत…

       विषमतेचे दोन प्रकार.1 आर्थिक विषमता.2 सामाजिक विषमता.विषमतेची दोन मजली ही इमारत .हिचा पाया हा धर्म आहे.धर्म म्हणजे मानवता धर्म नव्हे,तर पारंपरिक धर्म उदा.हिंदुधर्म ( वैदिक ब्राम्हण धर्म ), ख्रिचन धर्म,यहूदी,मुस्लिम इत्यादी पारंपरिक संप्रदाय धर्म ,हेच विषमतेचा पाया आहेत.

     धर्म ही एक व्यवस्था आहे.धर्म म्हणजे विचार आहेत.धर्माचे विचार विषमतावादी व्यवस्थेला पूरक आणि मदतगार आहेत.

     विषमता म्हणजे भेदभाव,उच्चनीचता,वरिष्ठकनिष्ठता, पवित्र अपवित्रतता,शुद्ध अशुद्धता.याची उत्पती वर्चस्ववाद,वंशवाद,यातून होते.यातूनच घराणेशाही,राजेशाही,हुकुमशाही उदयास येते.

    प्रत्येक धर्म देव,दैव, पुनर्जन्म, मोक्ष,पूर्वजन्मातील पापपुण्यानुसार गरीबी श्रीमंती,आणि वरिष्ठ किंवा शूद्र किंवा अस्पृश्य जातीत जन्म होतो,याचे शिक्षण मिळते.म्हणून सामान्य जनतेची तशी मानसिकता बनते.आत्मविश्वास,धैर्य,स्वावलंबन ,स्वाभिमान,आत्मसन्मान गमावून बसण्याचे शिक्षण धर्म देत असतो.तुझ्या हाती काहीच नाही,सारेकाही ईश्वराचे स्वाधीन आहे,तो ठेविले तैसेचि रहावे, चित्त असू द्यावे,समाधानी.अन्याय ,अत्याचार,बलात्कार ,साठेबाजी,काळाबाजार, ठकबाजी हे सारे सैतान मुळे होते. नशीब कमकुवत झाले की,सैतान त्याचा फायदा घेतो.त्यावर उपाय म्हणजे देवाकडे धावा करायचा की,” हे देवा या सैतानापासून मला वाचावं,माझ्यावरील संकट दूर कर,मी तुला गाय,सोने,जमीन दान देतो,तुला भंडारा करतो,मला नोकरी लागू दे,मला चांगले दिवस येऊ दे.कोर्टाचा निकाल माझ्याकडून लागू दे.मुझे अछेदिन आने दे. तू मेरा भला किया तो मैं तुझे मालामाल कर दुगा”. देवाला लालुच दाखवून,त्यास भ्रष्टाचारी बनवून आपले काम साध्य करण्याची सोय धर्मात आहे.

    देव दैव पुनर्जन्म,कर्म आणि पापपुण्य ,स्वर्ग नरक,सैतान,याच गोष्टी विषमता टिकविण्याचे काम करतात.धर्माच्या शिकवणीमुळे माणूस बौद्धिक पंगू होते.त्याची विचारशक्ती खुंटते.स्वतःला बुद्धी आहे,ती खरे खोटे,सत्य असत्य याचा शोध घेऊ शकते,नेमके हेच हा धर्म विसरायला लावते.म्हणून ही आर्थिक आणि सामाजिक विषमता ही नैसर्गिक किंवा देवाने निर्माण केली नसून येथील ऐतखाऊ,शोषक,आळशी,धूर्त, बदमाश,लोभी,स्वार्थी,दुर्जन,अहंकारी माणसांनी ही विषमता,हे वर्ग,हे जाती निर्माण केल्या आहेत.

   एकसंघ असलेला,एकीने आणि नेकीने चालणाऱ्या या समाजात वर्गीय ,जातीय व्यवस्था निर्माण करून,एकसंघ समाजाचे आधी चार वर्ण ( चार तुकडे ), नंतर या चार तुकड्याचे 650 जातीचे तुकडे करून,आपापसात भांडणे लाऊन,आपली सत्ता संपती प्रतिष्ठा सुरक्षित आणि मजबूत करण्याचे काम विषमतावादी मूठभर लोकांनी केले आहे.विभक्त राहण्याची,आणि उच्चनीचतेची मानसिकता ( जी धर्माने तयार केली ) ती घालविले शिवाय,आणि त्या ठिकाणी समतेची मानसिकता निर्माण झाल्या शिवाय कुणालाच अछे दीन येणार नाहीत,हेच सत्य होय.

              लेखक 

             दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 20 एप्रिल 2026.फोन : 9420912209.