ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI )चे 19 वे राज्य अधिवेशन 2/3/4 जुन 2025 ला अमरावती येथे होत आहे. SFI हि देशातील सर्वात मोठी व लढाऊ विद्यार्थी संघटना आहे. दलित, आदिवासी, ओबिसी , अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी काम करनारी संघटना आहे.
शाहु- फुले -आंबेडकर – बिरसा मुंडा – भगतसिंग याना आदर्श मानुन काम करते. या अधिवेशनात विद्यार्थ्यांचे विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. या अधिवेशनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड. अजित नवले,माकपाचे आमदार.कॉम्रेड विनोद निकोले , स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया चे अखिल भारतीय अध्यक्ष कॉ. व्हि.पी.सानु (केरल) , अखिल भारतीय सचिव कॉ.मयुख बिस्वास (पश्चिम बंगाल), राज्य अध्यक्ष कॉ.सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव कॉ.रोहिदास जाधव हे राहानार आहेत.
या अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांने या अधिवेशनात सहभागी होण्याचे आव्हान कॉ.अमोल मारकवार यांनी केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या संघटनेने काम करायच आहे त्यांनी संपर्क साधावा.



