Home Maharashtra चिमूर येथे बसपाचे प्रशिक्षण शिबीर संपन्न…

चिमूर येथे बसपाचे प्रशिक्षण शिबीर संपन्न…

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी

      चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पत संस्थेच्या सभागृहात बसपा द्वारे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

      या शिबिरामध्ये नवीन आणि जुने चळवळचे कायकर्ते सहभागी झाले होते.अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तथा प्रशिक्षणातंर्गत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

            या प्रशिक्षण शिबीरातंर्गत बसपाचे जिल्हा प्रभारी महेंद्र मकेश्वर,जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे,जिल्हा महासचिव सुभाष पेटकर,रामराव नन्नावरे विधानसभा इन्चार्ज यांचे मार्गदर्शन झाले.

       या प्रसंगी सचिन लाभणे चिमूर विधानसभा उपाध्यक्ष,सुधाकर रामटके,स्कायलाब मेश्राम,प्रीतम मेश्राम,संजय पाटील,जगदीश मून,धर्मदास गेडाम व इतर महिला कार्यकर्ते हजर होते.

        महेंद्र भिमटे,मेश्राम चिमूर शहर अध्यक्ष,प्रा.सहारे सर,धोंगडे सर हे सुद्धा प्रशिक्षण शिबीराला उपस्थित होते.

        प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन रामराव नन्नावरे यांनी केले.