शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर नगरपरिषद अंतर्गत येणारा काग-नंदरा पांदण रस्ता हा येथील शेतकऱ्यांसाठी जीवन वाहिनी आहे.हाच पाणंद रस्ता मंजूर होण्यासाठी सन २०२२ पासून रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे चिमूर तालुकाप्रमुख अशिद मेश्राम यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
अशिद मेश्राम यांनी काग-नंदारा पाणंद रस्त्याने ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन सन २०२३ रोजी. काग-नंदारा पाणंद रस्त्याचे काम मंजूर करण्यात यावे या करिता १४ दिवस बेमुदत आंदोलन करावे लागले.
परंतु या आंदोलन दरम्यान आश्वासनच मिळाले होते.शेवटी सन २०२५ रोजी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काग-नंदारा पाणंद रस्त्याच्या विकास कामासाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ३० लक्ष रु.निधी मंजूर करून दिला.
अखेर शेतकऱ्यांसाठी जीवन वाहिनी असलेला हा पाणंद रस्ता मंजूर झाला.याच निमित्ताने रोखठोक प्रहार कामगार संघटना व शेतकऱ्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे आभार मानत त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली.
जिल्हाधिकारी यांचे स्वागत करताना रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे,चिमूर तालुकाप्रमुख अशिद मेश्राम व काग येथील शेतकरी श्री.बापुरावजी पा.धोंगडे,अजाबराव नैताम,हरिदास गुळधे,सुरेश परचाके,नानाजी मेश्राम, बाबाराव धोंगडे,प्रतिक सोनटक्के,आदी उपस्थित होते.



