Home Maharashtra चिमूर नगरपालिकातंर्गत आणि चिमूर विधानसभातंर्गत पाण्याची उग्र समस्या केव्हा निकाली काढणार? ...

चिमूर नगरपालिकातंर्गत आणि चिमूर विधानसभातंर्गत पाण्याची उग्र समस्या केव्हा निकाली काढणार? — आमदार किर्तीकुमार भांगडीया हे काय करतात?

       रोखठोक 

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये 

           चिमूर नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या हद्दीतील नागरिक/महिला स्वच्छ व मुबलक पाण्यासाठी प्रतिक्षेत आहेत.परंतू वर्षानुवर्षे स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था करुन देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यशस्वी ठरत नसल्याचे दुर्दैव आहे.

         चिमूर नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मौजा बाम्हणी,मौजा वडाळा (पैकू) या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून भर उन्हाळ्यात तेथील नागरिकांनी पाण्यासाठी कुठे वनवन भटकंती करावी?असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर आहे.

        माजी मंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र विधिमंडळ नेते विजयभाऊ वडेट्टीवार हे आमदार म्हणून चिमूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत असताना चारगाव धरणातील पाणी चिमूर वाशियांसाठी आणले.

           मात्र,त्यावेळेस चिमूर ग्रामपंचायतीचे स्थळ होते.आज हेच चिमूर नगरपरिषदचे स्थळ झाले आहे.यामुळे चिमूर नगरपरिषदचे सिमांकन क्षेत्र वाढलेले आहे आणि लोक संख्या सुध्दा वाढलेली आहे.

            चिमूर नगरपरिषदचे वाढलेले सिमांकन क्षेत्र आणि सिमांकन क्षेत्रातंर्गत वाढलेली लोकसंख्या बघता पाण्यासारखा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा जिवणावस्यक गरजेकडे आमदार किर्तीकुमार भांगडीया आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी जातीने तथा तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.

            पण,आमदार आणि अधिकारी हे लोकसेवक असतात.त्यानी चिमूर नगरपरिषदेच्या हद्दीतील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले पाहिजे,या मताचे चिमूरकर आहेत.

           एवढेच काय तर चिमूर विधानसभा मतदारसंघातील पाणी समस्यांकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.

          चिमूर नगरपरिषद आणि चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पाणी पुरवठा करणारी व्यवस्था ही दिर्घकाळ ठरावी यासाठी उपाययोजना करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

             तद्वतच अल्प प्रमाणात पाण्याचा पुरवठा करणाऱ्या उपाययोजना ह्या कुचकामी ठरत असल्याने पाण्याचा मुबलक स्त्रोत असलेल्या ठिकाणावरूनच चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावे,असेच भविष्य सांगते आहे.

          आमदार किर्तीकुमार भांगडीया हे रस्त्याच्या बांधकामाकडे लक्ष देतात.परंतू पाण्याच्या गंभीर समस्यांकडे लक्ष देताना दिसत नाही.त्यांनी पाण्याच्या दिर्घकालीन व्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे,असे पाणी समस्यांचे वास्तविक चित्र आहे.

              आमदार किर्तीकुमार भांगडीया,तहसीलदार श्रीधर राजमाने,संबंधित विभागाचे अधिकारी आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघातील पाणी समस्या कायमची निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या मताची चिमूर विधानसभा मतदारसंघातील जनता आहे.

           सध्या स्थित चिमूर नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने,सदर पाणी समस्या उग्र रूप धारण करणार नाही याकडे वेळीच लक्ष कोण देणार?